जम्मू-काश्मीर, 12 जून : जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) मधील पुलवामा (Pulwama) येथे शनिवारपासून सुरू झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांचा खात्मा (three terrorist killed) केला आहे. चकमकीत ठार झालेले हे तिन्ही दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. काश्मीर झोनच्या पोलिसांनी ट्विट करुन या संदर्भात माहिती दिली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सकाळी ट्विट करत म्हटले की, “आज आणखी दोन दहशतवादी मारले गेले आहेत. एकूण तीन दहशतवाद्यांना आतापर्यंत ठार करण्यात आले आहे. या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारूगोळा तसेच काही आक्षेपार्ह साहित्य होते हे सर्व जप्त करण्यात आले आहे.”
भारतीय सैन्याला मोठं यश; लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा pic.twitter.com/ocPc80C0Wt
— News18Lokmat (@News18lokmat) June 12, 2022
काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, मारले गेलेले तिन्ही दहशतवादी हे दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाशी संबंधित होते. त्यापैकी एकाचे नाव जुनैद असे आहे. त्याने 13 मे रोजी आमचे सहकारी शहीद रियाझ अहमद यांची हत्या केली होती.
#PulwamaEncounterUpdate: Other two killed terrorists have been identified as Fazil Nazir Bhat & Irfan Ah Malik of Pulwama district. Incriminating materials, arms & ammunition including two AK 47 rifles and one pistol recovered: IGP Kashmir
— ANI (@ANI) June 12, 2022
तर फाजिल अहमद भट आणि इरफान अहमद मलिक अशी इतर मारले गेलेल्या दोन दहशतवाद्यांची नावे आहेत. जम्मू-काश्मीरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, कुलगाम येथील सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम ज्या ठिकाणी चकमक सुरू होती त्या ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढल्याची खात्री केली. यानंतर झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. मारले गेलेल्या दहशतवादी हे लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होते. काश्मीरमधील पोलीस, सुरक्षा दलांवर हल्ले आणि इतर हिंसक घटनांमध्ये हे दहशतवादी सहभागी होते. वाचा : केंद्राचं दहशतवादाविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण; 24 तासात मारले गेले 4 दहशतवादी चकमक ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणाहून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये 303 रायफल, 23 राऊंड काडतुसे, एक पिस्तूल आणि 31 राऊंड काडतुसे, एक हँडग्रेनेड तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. याआधी शुक्रवारी रात्री कुलगाममध्ये खांडीपोरा भागात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. ज्यामध्ये हिंजबुल मुजाहिद्दीनचा एक दहशतवादी मारला गेला होता. तर, जम्मू-काश्मीर पोलिसांसोबत केलेल्या एका संयुक्त कारवाईत 10 जून रोजी लष्कर-ए-तोयबाच्या 2 दहशतवाद्यांना बारामुल्ला येथून अटक केली होती.