श्रीनगर, 27 ऑक्टोबर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील त्राल येथे सोमवारी सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार मारण्यात यश आले. तर, एका दहशतवाद्यानं सुरक्षा दलाला शरण आला. लाइव्ह एनकाउंटकरच्यावेळी पालकांच्या उपस्थितीत या दहशतवाद्यानं आत्मसमर्पण केले. ठार झालेल्या दहशतवाद्याची अद्याप ओळख पटलेली नाही. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी जिल्ह्यातील अवंतीपोरा भागातील नूरपोरा येथे संयुक्त कारवाई सुरू केली. प्रवक्त्यानं सांगितले की चकमकीदरम्यान एक दहशतवादी ठार झाला तर एकानं आत्मसमर्पण केले. लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, चकमकीच्या ठिकाणी एक एके रायफल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील त्राल येथे सोमवारी सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार मारण्यात यश आले. तर, आणखी एक दहशतवादी सुरक्षा दलाला शरण गेला. pic.twitter.com/ymmXroiEan
— News18Lokmat (@News18lokmat) October 27, 2020
गुलशनपोरा भागातील रहिवासी असलेल्या दहशतवाद्याचे नाव साकीब अकबर वाजा असे आहे. त्याला सुरक्षा दलानं ताब्यात घेतले. साकीब यावर्षी 25 सप्टेंबरपासून बेपत्ता होता. दहशतवादी संघटनेत सामील होण्यापूर्वी दहशतवादी साकीब सिव्हील इंजिनिअरिंगचा अभ्यास करत असल्याची माहिती मिळाली आहे. दहशतवादी साकीबला शरण जाण्यासाठी त्याच्या पालकांची मदत घेण्यात आली. चकमकीच्या वेळी त्याच्या पालकांना घटनास्थळी बोलावले होते. त्यानंतरच त्याने चकमकीदरम्यान आत्मसमर्पण केले. मुख्य म्हणजे एका महिन्यात आत्मसमर्पण करणारा जम्मू-काश्मीरमधील हा पाचवा दहशतवादी आहे.