‘ प्रियंका, तुझी काळजी वाटते आणि...’ हाथरस भेटीवर रॉबर्ट वाड्रांची भावूक प्रतिक्रिया

‘ प्रियंका, तुझी काळजी वाटते आणि...’ हाथरस भेटीवर रॉबर्ट वाड्रांची भावूक प्रतिक्रिया

'असे अत्याचार रोखण्यासाठी आघाडीवरच जावून लढले पाहिजे. देशातल्या दु:खी लोकांना न्याय द्यायचा असेल तर हाच ऐकमेव मार्ग आहे.'

  • Share this:

नवी दिल्ली 04 ऑक्टोबर: काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांची हाथरस भेट चांगलीच गाजली आहे. पीडित मुलीच्या आईने प्रियंका यांना बिलगून टाहो फोडला होता. ते फोटो आणि VIDEO सोशल माध्यमांवरही चांगलेच गाजले आहेत. पोलिसांनी प्रियंका गांधी यांच्याशी जे वर्तन केले त्यावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रियंका यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी भावूक ट्विट करत प्रियंका यांच्या दौऱ्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

प्रियंका तुझा अभिमान आहे. देशातल्या दु:खी लोकांना न्याय द्यायचा असेल तर हाच ऐकमेव मार्ग आहे. मला आणि सर्व कुटुंबीयांना तुझी आणि देशातल्या लोकांची काळजी वाटते. पण असे अत्याचार रोखण्यासाठी आघाडीवरच जावून लढले पाहिजे असंही वाड्रा यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व प्रियांका गांधी यांनी हाथरस पीडितेच्या कुटुंबीयांची शनिवारी भेट घेतली.  कुटुंबीयांची भेट घेण्यापासून राहुल गांधी व प्रियांका गांधी यांना मज्जाव करण्यात आला होता. पण अखेर त्यांनी कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केलं.

यावेळी अत्यंत दु:खात असलेल्या त्या कुटुंबीयांसोबत राहुल व प्रियांका गांधी यांनी बातचीत केली. यावेळी हाथरस प्रकरणातील पीडितेच्या आईने प्रियांका गांधी यांच्या खांद्यावर डोकं ठेवून आपलं दु:ख व्यक्त केलं. यावेळी त्या ढसाढसा रडल्या.

मुलीला इतक्या क्रुरपणे मारण्यात आले व त्यानंतर तिचं शेवटचं दर्शनही घेता आले नसल्याने कुटुंबीय अत्यंत भावूक झाले. कुटुंबीयांकडून मुलीच्या न्यायाची मागणी केली जात आहे. राहुल व प्रियांका गांधी यांनाही याबाबत कडक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 4, 2020, 4:07 PM IST

ताज्या बातम्या