जाहिरात
मराठी बातम्या / देश / लसीकरणाचा उत्सव साजरा करणार होते, काय झालं? प्रियांका गांधीचा मोदींना टोला

लसीकरणाचा उत्सव साजरा करणार होते, काय झालं? प्रियांका गांधीचा मोदींना टोला

लसीकरणाचा उत्सव साजरा करणार होते, काय झालं? प्रियांका गांधीचा मोदींना टोला

Priyanka Gandhi on Modi : ‘भाजप सरकारने 12 एप्रिल रोजी लसीकरण ‘उत्सव’ साजरा केला. परंतु, आणि या 30 दिवसांत आमच्या देशातील लसीकरण 82 टक्क्यांनी कमी झालं.’

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 12 मे : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि पक्षाचे सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांनी बुधवारी देशातील कोरोना विषाणू प्रसार आणि लसीकरणाच्या स्थितीबद्दल केंद्र सरकारवर निशाणा साधला. या भीषण महासाथीमध्ये लोकांच्या घरा-घरामध्ये जाऊन लसीकरण करणे गरजेचे आहे. केवळ सकारात्मक बोलून खोटी आश्वासनं देणं आणि खोटे सल्ले देणे ही देशवासीयांची फसवणूक असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी ट्विट केलं की, ‘ उगीचच सकारात्मक विचारसरणीचा बनाव करून खोटा दिलासा देणे हा आरोग्य कर्मचारी, आपल्या प्रियजनांना गमावलेल्या आणि ऑक्सिजन-रुग्णालय-औषधाच्या कमतरतेस सामोरे जाणाऱ्या इतर कुटुंबांची क्रूर चेष्टा आहे. देशातील लोकांची ही फसवणूक आहे.’ भारत सर्वात मोठा लस उत्पादक देश आहे. भाजप सरकारने 12 एप्रिल रोजी लसीकरण ‘उत्सव’ साजरा केला. परंतु, कोणत्याही लसीची व्यवस्था केली नाही आणि या 30 दिवसांत आमच्या देशातील लसीकरण 82 टक्क्यांनी कमी झाले, असे प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी ट्विट करून म्हटले आहे.

जाहिरात

पंतप्रधान नरेंद्र मोदी लसी बनवणाऱ्या कंपन्यांकडे गेले, छायाचित्रेही घेतली. पण त्यांच्या सरकारने पहिल्या लसीचा आदेश जानेवारी 2021 मध्ये का दिला? अमेरिका आणि इतर देशांनी लस बनवणाऱ्या भारतीय कंपन्यांना खूप पूर्वीच ऑर्डर्स दिल्या होत्या. याची जबाबदारी कोण घेणार?’ असा सवाल प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारला केला. हे वाचा -  ‘मास्क काढा भावानो, कोरोना बिरोना काय नाय’ बोंबलत फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांचा कोल्हापुरी झटक! VIDEO राहुल गांधी म्हणाले की, कोरोनावरील लस आपल्याला प्रत्येक व्यक्तीच्या घरा-घरात पोहचवावी लागेल. याशिवाय या साथीविरोधात लढा देणे अशक्य आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात