26 जून : आधीच फीवाढीच्या कटकटीला कंटाळलेल्या पालकांचा खर्च 1 जुलैपासून अधिकच वाढणार आहे.कारण बहुतेक स्टेशनरीच्या वस्तू ज्यांवर आतापर्यंत 5 टक्के टॅक्स होता त्यांच्यावर आता 12 ते 28 टक्के टॅक्स बसणार आहे . तसंच यातल्या बऱ्याच वस्तू शाळेला ही लागत असल्याने प्रायव्हेट शाळांची फीदेखील वाढू शकते.
सर्वाधिक टॅक्स म्हणजे 28 टक्के टॅक्स हा ,बॉर्ड ,पंचीग मशीन , स्टेपलर ,रंग आणि इंडेक्स फाईल क्लिपवर लागू होणार आहे. त्या खालोखाल 18 टक्के कर हा स्कूल बॅग,
ग्लू, ग्लूस्टिक ,पॉलीबॅग लिहायचा आणि ड्रॉइंगचा बोर्ड, इरेजर ,रबर बॅंड कार्बन पेपर आणि फाईल कव्हरवर बसणार आहे.तर 12 टक्के टॅक्स कार्डबोर्ड ,शाई, पेन या गोष्टींवर लागू होणार आहे.
तर एकंदर मुलांच्या शिक्षणासाठी मध्यमवर्गावर आपला खिसा अधिक रिता करण्याची वेळ 'जीएसटी'मुळे येणार आहे .
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.