जेव्हा राष्ट्रपती कोविंद यांच्यातले आजोबा जागे होतात!

जेव्हा राष्ट्रपती कोविंद यांच्यातले आजोबा जागे होतात!

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यातला सामान्य माणूस अजूनही जागा आहे, याचा प्रत्यय काल शिमल्यामध्ये आला.

  • Share this:

शिमला, 23 मे : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यातला सामान्य माणूस अजूनही जागा आहे, याचा प्रत्यय काल शिमल्यामध्ये आला. एका कार्यक्रमासाठी कोविंद शिमल्यात होते. त्यांना सामान्य माणसाप्रमाणं फेरफटका मारावासा वाटला.तसं त्यांनी त्यांच्या सुरक्षा टीमला सांगितलं.

मग सगळा लवाजमा पायी निघाला. कोविंद यांना पुस्तकाचं दुकान दिसलं. ते त्यात गेले आणि नातवंडांसाठी पुस्तकं घेतली. विशेष म्हणजे त्यांनी तुमच्या-आमच्या प्रमाणंच डेबिट कार्डनं पैसे दिले.

२०१७मध्ये ते बिहारचे राज्यपाल होते तेव्हा शिमल्याला आले होते. यावेळी तिथल्या विद्यापिठातल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली.

कुणीही सेलिब्रिटी सर्वसामान्य माणसांसारखे वागले की जनतेसाठी तो आश्चर्याचा विषय ठरतो. राष्ट्रपतींनी आपल्या नातवंडांसाठी केलेली पुस्तक खरेदी चर्चेचा विषय ठरली.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2018 02:10 PM IST

ताज्या बातम्या