जाहिरात
मराठी बातम्या / देश / Pranab Mukherjee Death Anniversary : प्रणबदा, देशाला न लाभलेले पंतप्रधान! एक-दोन नाही तर तब्बल 3 वेळा अशी हुकली संधी

Pranab Mukherjee Death Anniversary : प्रणबदा, देशाला न लाभलेले पंतप्रधान! एक-दोन नाही तर तब्बल 3 वेळा अशी हुकली संधी

Pranab Mukherjee

Pranab Mukherjee

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी (Pranab Mukherjee Death Anniversary) यांची आज दुसरी पुण्यतिथी आहे. 31 ऑगस्ट 2020 ला प्रणब मुखर्जी यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी (Pranab Mukherjee Death Anniversary) यांची आज दुसरी पुण्यतिथी आहे. 31 ऑगस्ट 2020 ला प्रणब मुखर्जी यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रणव मुखर्जी देशाचे पंतप्रधान व्हायला पाहिजे होते, असं अनेकांना वाटत होतं, त्यामध्ये सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांचाही समावेश आहे, पण संधी असूनही प्रणव मुखर्जी पंतप्रधान होवू शकले नाहीत. त्यामुळे प्रणव मुखर्जी यांचा देशाला न लाभलेला पंतप्रधान असा उल्लेख अनेक ठिकाणी केला जातो. पंतप्रधानपदाची पहिल्यांदा हुलकावणी प्रणव मुखर्जी पंतप्रधान पदापर्यंत पोहोचण्याची पहिली शक्यता 1984 मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झाली होती. इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात प्रणब मुखर्जी अर्थमंत्री होते, त्यावेळी इंदिरा गांधींनंतर प्रणबदा पक्षात दुसऱ्या क्रमांकावर होते. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या अनुपस्थितीत प्रणब मुखर्जी मंत्रिमंडळाच्या बैठका घेत असत. त्यावेळी प्रणब मुखर्जी यांची प्रसिद्धी काय होती, याचं उदाहरण द्यायचं झालं तर तेव्हा “युरो मनी” या प्रसिद्ध मासिकाने “जगातील सर्वोत्तम अर्थमंत्री” अश्या शब्दात प्रणब मुखर्जी यांचा गौरव केला होता. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर प्रणब मुखर्जी हेच पंतप्रधान बनतील अशी अपेक्षा होती. पण प्रणब मुखर्जी यांच्या याच राजकीय महत्त्वकांक्षेमुळे त्यांना मोठा राजकीय आघात सहन करावा लागला. इंदिरा गांधी यांच्या नंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले, आणि प्रणबदांना बाजूला सारले गेले. राजीव गांधी यांनी प्रणबदांना फक्त मंत्रिमंडळातूनच बाहेर ठेवले नाही तर कॉंग्रेसच्या सक्रीय राजकारणातून बाहेर ठेवले. त्यावेळी त्यांना पश्चिम बंगाल प्रदेश कॉंग्रेस कमिटीची जबाबदारी म्हणून त्यांना कोलकाताला पाठवण्यात आले, यावर नाराज होऊन त्यांनी पक्ष सोडला. कॉंग्रेस मधून बाहेर पडल्यावर 1986 साली त्यांनी राष्ट्रीय समाजवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली. 1987 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या निकृष्ट कामगिरीनंतर प्रणब मुखर्जी यांना समजले की हा नवीन पक्षाचा पर्याय त्यांच्यासाठी नव्हता. त्यानंतर त्यांनी राजीव गांधीसोबत तुटलेला संवादाचा पूल पुन्हा जोडला आणि 1989 मध्ये त्यांचा पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन केला. दुसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याची संधी प्रणब मुखर्जी दुसऱ्यांदा पंतप्रधान होण्याची शक्यता 1991 मध्ये नव्हती, कारण त्या वेळी कॉंग्रेसमध्ये परतून त्यांना जास्त वेळ झाला नव्हता. या काळात ते नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करत असत. प्रणबदांना दुसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याची संधी 2004 मध्ये पुन्हा एकदा आली होती. 2004 साली जेव्हा यूपीए-1 सरकार स्थापन करणार होते. त्यावेळी विरोधी पक्षाच्या दबावाखाली सोनिया गांधींनी हे पंतप्रधानपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा अनेकांना 1984 आणि 1991 मध्ये हुकलेली संधी प्रणबदांना 2004 ला मिळेल, असं वाटत होतं. त्याच वर्षी पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक जिंकून प्रणब मुखर्जी संसदेत पोहोचले हा योगायोग होता. कदाचित त्यामुळे प्रणबदांसाठी परिस्थिती अनुकूल वाटत होती. आपल्या आत्मचरित्रामध्ये प्रणबदांनी याबद्दल लिहिले आहे की, ‘अशी आशा व्यक्त केली जात होती की, सोनिया गांधी यांनी नकार दिल्यास पंतप्रधानपदासाठीचा पुढचा पर्याय माझा असेल. कदाचित या अपेक्षेचा आधार असा होता की मला सरकारमध्ये राहण्याचा अफाट अनुभव आला असेल तर सिंग यांच्या अनुभवाचा बराचसा भाग नोकरशाहीत होता. ’ पण सर्वांनाच आश्चर्य वाटले, जेव्हा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान पदासाठी मनमोहनसिंग यांचे नाव पुढे केले. असे मानले जाते की प्रणब मुखर्जींनी आपली शक्ती मानली ती त्यांच्यासाठी कमकुवत दुवा ठरली. पंतप्रधानपदी मनमोहनसिंग यांचे नाव निश्चित झाल्यानंतर प्रणव मुखर्जी यांनी सरकारमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला, कारण मनमोहन सिंग त्यांच्यापेक्षा ज्युनिअर होते, असंही दिल्लीमध्ये सांगितलं जातं. पण त्यावेळी सोनिया गांधी देखील प्रणब मुखर्जी यांना सरकारमध्ये ठेवू इच्छित होत्या, कारण ते युती सरकार होते आणि प्रणबदा यांचे मित्र सर्व पक्षात होते. त्यामुळे प्रणब मुखर्जी मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले. मनमोहन सिंग सरकारमध्ये त्यांनी संरक्षण, वित्त आणि परराष्ट्र व्यवहार यासारखी महत्त्वाची मंत्रालये सांभाळली. मध्ये पुन्हा एकदा प्रणव मुखर्जी पंतप्रधान बनणार असल्याची चर्चा झाली. त्यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची बायपास शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे त्यांना बराच काळ विश्रांती घ्यावी लागली. यावेळी पंतप्रधानांचे काम प्रणब मुखर्जी पाहत असल्याचा दावा विकीलिक्समध्ये करण्यात आला होता. यूपीए राष्ट्रपती पदासाठी उमेदवार निवडण्याचा प्रयत्न करीत होते, तेव्हाही प्रणबदांना पंतप्रधान व्हायची आशा होती. आपल्या आत्मचरित्रात त्यांनी असे लिहिले आहे की, सोनिया गांधींनी त्यांना सांगितले होते की, ‘तुम्ही या पदासाठी सर्वोत्कृष्ट दावेदार आहात, पण जर तुम्ही सरकारमध्ये जबाबदार भूमिका निभावत असाल तर अशा परिस्थितीत तुम्ही दुसरे नाव सुचवाल काय?’ प्रणब मुखर्जी यांच्या मते मनमोहनसिंग यांना राष्ट्रपती करता येईल आणि त्यांना पंतप्रधान करण्यात यावं अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली, पण त्यावेळीही तसं झाले नाही आणि ते देशाचे 13 वे राष्ट्रपती बनले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात