मराठी बातम्या /बातम्या /देश /

विरोधकांवर 'विजय' मिळवून देणारी बगलामुखी देवी, या मंदिरात पंकजा मुंडेंनी केली विशेष पूजा

विरोधकांवर 'विजय' मिळवून देणारी बगलामुखी देवी, या मंदिरात पंकजा मुंडेंनी केली विशेष पूजा

भोपाळमधल्या संघटनेच्या बैठकीनंतर मध्य प्रदेशात नालखेडा (Nalkheda) येथे असलेल्या देवीच्या मंदिरात पंकजा मुंडे यांनी दर्शन घेऊन होम केला.

भोपाळमधल्या संघटनेच्या बैठकीनंतर मध्य प्रदेशात नालखेडा (Nalkheda) येथे असलेल्या देवीच्या मंदिरात पंकजा मुंडे यांनी दर्शन घेऊन होम केला.

भोपाळमधल्या संघटनेच्या बैठकीनंतर मध्य प्रदेशात नालखेडा (Nalkheda) येथे असलेल्या देवीच्या मंदिरात पंकजा मुंडे यांनी दर्शन घेऊन होम केला.

रजनीश सेठी, भोपाळ, 1 एप्रिल : भाजपच्या वरिष्ठ नेत्या (BJP Leader) आणि मध्य प्रदेश भाजपच्या सहप्रभारी (Madhya Pradesh BJP Co-incharge) पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी शुक्रवारी (1 एप्रिल 2022) जगप्रसिद्ध माँ बगलामुखी मंदिराला (Maa Baglamukhi Temple) भेट दिली. भोपाळमधल्या संघटनेच्या बैठकीनंतर मध्य प्रदेशात नालखेडा (Nalkheda) येथे असलेल्या देवीच्या मंदिरात त्यांनी दर्शन घेऊन होम केला. माँ बगलामुखी मंदिराबाबत अशी आख्यायिका आहे, की या ठिकाणी होम केल्यानं विजय मिळतो. मंदिरात विशेष पूजा (Pooja) आणि होमविधी केल्यानंतर पंकजा मुंडेंनी 31 मार्चला झालेल्या संघटनेच्या बैठकीबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, 'मंथन केल्यानं अमृत मिळतं, त्याप्रमाणे आमच्या संघटनेतच्या वैचारिक मंथनातूनही फक्त अमृतच निघावं, अशी अपेक्षा आहे. ज्या ठिकाणी आमच्या पक्षाला कधीच विजय मिळालेला नाही, तिथूनही आम्हाला विजय मिळो. जनतादेखील देशभरात विविध ठिकाणी भाजपला निवडून देत आहे. कुठे आहे मंदिर? देवीचं हे मंदिर मध्य प्रदेशात नालखेडा इथल्या नदीच्या काठी वसलेलं असून त्यात माँ बगलामुखीची स्वयंभू मूर्ती असल्याचं सांगितलं जातं. विशेष म्हणजे हे मंदिर स्मशानभूमीत (Cemetery) वसलेलं आहे. महाभारतातल्या (Mahabharata) युद्धाच्या 12 व्या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या सूचनेनुसार युधिष्ठिरानं या मंदिराची स्थापना केल्याचं म्हटलं जातं. कौरवांविरुद्धचं युद्ध जिंकण्यासाठीच युधिष्ठिरानं या मंदिराची स्थापना केली होती, असंही म्हटलं जातं. माँ बगलामुखी ही तंत्रविद्येची देवी असल्याची श्रद्धा आहे. होमात लाल मिरची आणि मोहरीची दिली जाते आहुती बगलामुखीच्या या मंदिराभोवती असलेली प्रत्येक रचना तिथल्या दैवी शक्तीचं अस्तित्व सिद्ध करते. मंदिराच्या उत्तरेला भैरव महाराजांचं ठाणं आहे, तर पूर्वेला हनुमानाची मूर्ती आहे. मंदिराच्या पाठीमागून लाखुंदर नदी वाहते. मंदिराच्या चारही दिशांना स्मशानभूमी असल्यानं तिथल्या वातावरणामध्ये तंत्रविद्येचं अस्तित्व जाणवतं. नवरात्रीमध्ये या ठिकाणच्या होमाला विशेष महत्त्व आहे. होमात लाल मिरची आणि मोहरीचीही आहुती दिली जाते.

हे वाचा - पंतप्रधान मोदींच्या जीवाला धोका? मुंबईच्या NIA शाखेला आलेल्या धमकीच्या ई-मेलमधून धक्कादायक खुलासा

राजयोग आणि विरोधकांवर विजय मिळवून देणारी देवी दहा महाविद्यांपैकी आठवं रूप माता बगलामुखीचं आहे. देवीच्या चेहऱ्यावर बगळ्याप्रमाणे एकाग्रता एकवटलेली दिसते म्हणूनच तिला बगलामुखी म्हणतात. शत्रूवर विजय, राजकीय विजय, मुलांचं शिक्षण, कायदेशीर प्रकरणांमध्ये यश मिळवण्यासाठी या देवीची पूजा केली जाते. द्वापारयुगातलं मंदिर देवीचं हे द्वापारयुगातलं मंदिर आहे. देशभरातून शैव आणि शाक्तमार्गी ऋषी-मुनी येथे तांत्रिक विधीसाठी येतात. या मंदिरात देवी बगलामुखीव्यतिरिक्त लक्ष्मी, कृष्ण, हनुमान, भैरव आणि सरस्वती या देवतादेखील विराजमान आहेत. बगलामुखीला आठवी महाविद्या आणि अधिष्ठात्री असंही म्हणतात. असं म्हटलं जातं, की माँ बगलामुखी भक्तांच्या मनातली भीती दूर करते आणि शत्रू व वाईट शक्तींचा नाश करते. देवीला पिवळा रंग (Yellow) आवडतो असं म्हणतात. यामुळेच पूजेत पिवळ्या रंगाचा वापर केला जातो. या देवीला पितांबरा असंही म्हणतात. अशा प्रसिद्ध मंदिरामध्ये जाऊन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देवीचं दर्शन घेतलं.
First published:

Tags: BJP, Pankaj munde

पुढील बातम्या