Home /News /national /

Exclusive : रणनीतिकार प्रशांत किशोर यांचा काँग्रेसला सल्ला, प्रत्येक दोन वर्षात बदलावा यूपीए अध्यक्ष

Exclusive : रणनीतिकार प्रशांत किशोर यांचा काँग्रेसला सल्ला, प्रत्येक दोन वर्षात बदलावा यूपीए अध्यक्ष

निवडणुकीचे रणनीतिकार प्रशांत किशोर (Political Strategist Prashant Kishor) यांनी 2024 लोकसभा निवडणुकीपर्यंतचा काँग्रेस पक्षाचे नियोजन कसे राहील, हे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि काँग्रेस नेत्यांसमोर मांडले आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 23 एप्रिल : निवडणुकीचे रणनीतिकार प्रशांत किशोर (Political Strategist Prashant Kishor) यांनी 2024 लोकसभा निवडणुकीपर्यंतचा काँग्रेस पक्षाचे नियोजन कसे राहील, हे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि काँग्रेस नेत्यांसमोर मांडले आहे. लवकरच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यावर निर्णय घेणार आहेत. प्रशांत किशोर यांनी कांग्रेस संदर्भात प्रत्येक स्वरुपाचा सल्ला निर्णय दिले आहे. काँग्रेस पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांनी यूपीए म्हणजे संयुक्त पुरोगामी आघाडीसंदर्भात महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. बैठकीत उपस्थित असलेल्या एका काँग्रेस नेत्याने सांगितले की, प्रशांत किशोर यांनी यूपीएचे अध्यक्ष (UPA President) दर दोन वर्षांनी बदलण्याची सूचना केली आहे. म्हणजेच प्रत्येक दोन वर्षांनी रोटेशनच्या स्वरूपात अध्यक्ष बदलण्यात यावा. प्रशांत किशोर यांनी दिले एनडीएचे उदाहरण - काँग्रेसचे वरिष्ठ नेते यांच्यानुसार, प्रशांत किशोर यांनी एनडीएचे उदाहरणदेखील दिले आहे. जसे की, चंद्रबाबू नायडू, जार्ज फर्नांडिस देखील एनडीएचे संयोजक होते. आणि एनडीएमध्ये संयोजक बदलले जात होते. तसेच यूपीएमध्ये देखील करण्यात यावे. यूपीएचे नाव बदलण्याची सूचना - प्रशांत किशोर यांनी केवळ यूपीए अध्यक्ष पदाबद्दलच नाही तर यूपीएचे नाव बदलण्याचाही सल्ला दिला आहे. तर नाव काय असले पाहिजे, याबाबत प्रशांत किशोर यांनी काहीही सांगितले नाही. हेही वाचा - मोठी बातमी ! पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उद्या एकाच मंचावर येण्याची शक्यता सोनिया गांधी यूपीएच्या अध्यक्षा - 2004 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील उर्वरित पक्षांसह संयुक्त पुरोगामी आघाडी अस्तित्त्वात आली. तेव्हापासून सोनिया गांधी यूपीएच्या अध्यक्षा आहेत. काय आहे प्रशांत किशोर यांचा प्लान?  प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेतृत्वासमोर सविस्तर आराखडा ठेवला आहे. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांच्या सादरीकरणात ५६५ स्लाइड्स होत्या. प्रशांत किशोर यांच्या प्लानमध्ये  काँग्रेस अध्यक्षांपासून ते निवडणुकीची रणनीती, संवादाची रणनीती, भविष्यातील कार्यक्रमांसह पक्षाशी संबंधित सर्व बाबींवर चर्चा करण्यात आली.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Prashant kishor, Sonia gandhi, UPA

    पुढील बातम्या