पंजाब नॅशनल बँकेचे 14 हजार कोटी रुपये बुडवून नीरज मोदी परदेशात पळून गेला. तेव्हापासून ED त्याच्या मागे आहे. ब्रिटनमध्ये तो आश्रयाला गेला होता. त्याचं प्रत्यार्पण करावं यासाठी भारत प्रयत्नशील होता. आर्थर रोड जेलमध्येच होणार मोदीची रवानगी प्रत्यार्पण केल्यानंतर नीरव मोदीची रवानगी मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात केली जाणार आहे. PNB घोटाळा प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत त्याला आर्थर रोड तुरुंगात राहावं लागणार आहे. ब्रिटीश न्यायमूर्तींनी त्याबाबतही निर्णय दिला आहे. मुंबईच्या आर्थर रोड जेलमधलं कोठडी क्रमांक 12 (Barrack 12 at Arthur Road Jail) नीरव मोदीसाठी योग्य असल्याचा निर्वाळा ब्रिटीश जजनी दिला आहे.ब्रिटेन के जज ने नीरव मोदी के भारत प्रत्यर्पण का आदेश दिया। pic.twitter.com/wXsz2isFl0
— ANI_HindiNews (@AHindinews) February 25, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Criminal, Financial crime, India, International, Money, Money fraud, Nirav modi extraction, Theft, United kingdom