• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • विनामास्क फिरणाऱ्या 'त्या' पर्यटकांचा भयंकर फोटो खरा की खोटा?

विनामास्क फिरणाऱ्या 'त्या' पर्यटकांचा भयंकर फोटो खरा की खोटा?

हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड viral झाला आहे. त्यातच मोदींनीही तिसऱ्या लाटेविषयी भाष्य केलं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 13 जुलै : कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेचा जोर (Second Wave) ओसरत असताना पावसाळ्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक (Tourists) वेगवेगळ्या हिल स्टेशन्सवर (Hill stations) गर्दी करत असल्याचं चित्र आहे. हा एन्जॉय करण्याचा काळ नसून कोरोनाला हरवण्याचा काळ आहे; आपण बोलावू तेव्हाच तिसरी लाट (Third wave) येईल, असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) चिंता व्यक्त केली आहे. वेगवेगळ्या पर्यटन स्थळी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांचं प्रमाण वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. ईशान्येतील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींची बैठक पार पडली. विशेषतः ईशान्येतील राज्यांमध्ये सध्या कोरोनाचा उद्रेक वाढत असून पर्यटन हाच मुख्य व्यवसाय असल्याने पर्यटकही मोठ्या संख्येनं दाखल होत आहे. एकीकडे कोरोनाचे संकट आणि दुसरीकडे पर्यटनाचा मौसम अशा परिस्थितीत आरोग्य आणि अर्थकारण यांचा मेळ कसा साधायचा, याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. पर्यटन हाच ईशान्येतील राज्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असला, तरी सध्याची आव्हानं लक्षात घेऊन मास्क न घालता होणारी गर्दी टाळली पाहिजे, असा सल्ला पंतप्रधानांनी दिला आहे. मास्क न घालता फिऱणारी गर्दी पाहून प्रत्येकाच्या मनात धडकी भरायला हवी, असंही ते म्हणाले. पर्यटकांची जागोजागी गर्दी दुसरी लाट ओसरत असतानाच पावसाळा सुरु झाल्यामुळे अनेक पर्यटक सध्या वेगवेगळ्या पर्यटनस्थळी दाखल होत आहेत. विशेषतः ईशान्येकडील राज्यांना पर्यटकांची पसंती मिळत असल्याचं चित्र आहे. त्याशिवाय कुलु, मनालीमध्ये पर्यटकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे. तो फोटो जुना असल्याचं सिद्ध दरम्यान, मनालीतील मास्क न लावता फिऱणाऱ्या गर्दीचा व्हायरल होत असलेला फोटो हा जुना असून तो कोरोनापूर्व काळातील असल्याचं फॅक्ट चेकिंगमध्ये स्पष्ट झालं आहे. मनालीतील मॉल रोडवर मोठा समूह जमला असून त्यातील कुणीही मास्क न लावल्याचा फोटो व्हायरल झाल्यामुळे देशभरात एकच चर्चा सुरू झाली होती. पर्यटकांच्या बेजबाबदार वर्तनापासून ते प्रशासनाच्या हलगर्जीपणापर्यंत अनेक मुद्द्यांवर नेटिझन्सनी टीकेची झोड उठवली होती. मात्र त्यानंतर हा फोटो जानेवारी 2019 मध्ये काढण्यात आलेला असून कोरोनाच्या आक्रमणापूर्वीचा असल्याचं दिसून आलं आहे.
  Published by:desk news
  First published: