जाहिरात
मराठी बातम्या / देश / लवकरच पेट्रोल होणार स्वस्त! केंद्र सरकारनं घेतला मोठा निर्णय

लवकरच पेट्रोल होणार स्वस्त! केंद्र सरकारनं घेतला मोठा निर्णय

लवकरच पेट्रोल होणार स्वस्त! केंद्र सरकारनं घेतला मोठा निर्णय

आता भारतात 766 कोटी रुपये खर्चुन तयार होणार पर्यावरणपुरक इंधन.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर : पट्रोल-डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस गगनाला भिडत आहे. यातच वाहनचालकांना दिलासा देण्यासाठी सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकराच्या वतीनं पर्यावरण मंत्रालयानं (Ministry of Environment) हरियाणाच्या पानीपतमध्ये पेट्रोलियम इंधनच्या रुपात बायोमास इथेनॉल यंत्रसंच तयार करण्यासाठी इंडियन ऑइलला (IOCL) मंजूरी दिली आहे. याबाबत पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन मंत्री प्रकाश जावडेवर यांनी रविवारी माहिती दिली. यावेळी जावडेवर यांनी, पर्यावरणपुरक इंधनच्या (Environmentally friendly fuel) रुपात इथेनॉलच्या वापराला पुढाकार देण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे. यात IOCLच्या दुसऱ्या बायोमास आधारित इंधन 2जी इथेनॉल यंत्रसंच (2G Ethanol Plant) लावण्यासाठी आयओसीएलला पर्यावरण मंत्रालयानं मंजूरी दिली आहे. शेतकऱ्यांना दुप्पट वेतन मिळणार पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट करत, “मला हे सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे की आयओसीएलला पानीपतमध्ये नवीन 2जी इथेनॉल यंत्रसंच स्थापित करण्यासाठी मंजूरी दिली आहे”, असे सांगितले. तसेच, जावडेकर यांनी ही योजना पर्यावरणपुरक इंधन मिळण्यास फायदा होईल त्याचबरोबर शेतकऱ्यांना याचा फायदा होत दुप्पट वेतन मिळण्यास मदत होईल, असेही सांगितले.

जाहिरात

महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयओसीएलनं 100 किलोलीटर प्रतिदिन उत्पादन क्षमता असलेले 2जी इथेनॉल यंत्रसंचासंबंधी रिपोर्ट पर्यावरण मंत्रालयाला पाठवले होते. त्याचा अभ्यास करून पर्यावरण मंत्रालयानं या प्रकल्पासाठी दिली आहे.

766 कोटी रुपयांची होणार गुंतवणूक पेट्रोलियम उत्पादन करणारी सर्वात मोठी कंपनी IOCLने या प्रकल्पासाठी 766 कोटी रुपयांची इथेनॉल प्रकल्पाची परियोजनेची सरकारकडून परवानगी मागितली आहे. यात बायोमासच्या आधारावर इंधनच्या रुपात इथेनॉलच्या उत्पादनासाठी धान्य आणि कृषी उत्पादकांचा वापर केला जाणार आहे. या प्रकल्पातून 100 किलीलीटर इथेनॉलच्या उत्पादनासाठी 473 टन पेंढ्याची गरज असणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात