बिहारमधून काल रात्री उशिरा एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. येथे रुस्तमपूरच्या दिशेने एक बोट निघाली होती. यातून शेकडो लोक प्रवास करीत होते. मात्र जशी बोट गंगेत पोहोचली तसा बोटीचा हायटेंशन तारेशी संपर्क आला. ज्यात बोटीत बसलेल्यांना धक्का जाणवला. याची सूचना मिळताच एसडीआरएफ, एनडीआरएफसह पोलिसांनी टीम घटनास्थळी पोहोचली.
स्थानिक दुसरी बोट घेऊन घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केलं. या अपघातात बेपत्ता झालेल्यांचाही तपास सुरू आहे.
घटनेमुळे स्थानिकांमध्ये आक्रोश आहे. या प्रकरणात ते राज्य सरकारला दोषी मानत आहेत. ते म्हणाले की, दियारावासी येथे पक्का पुल नसल्याकारणाने लोक बोटीतून प्रवास करतात.
या अपघातात अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. हायटेंनशनच्या तारेशी संपर्क आल्यामुळे अनेकजणं भाजले आहेत.
या प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, 3 जणं बेपत्ता असून काल रात्री एक बोट हायटेंशन तारेच्या संपर्कात आली होती. ज्यामुळे संपूर्ण बोटीत करंट पसरला. या अपघातात 38 जणं जखमी झाले आहे. तर काही जणं जीव वाचविण्यासाठी गंगेत उडी मारली. गंगेत उडी मारलेले तिघेजण बेपत्ता आहेत.
बेपत्ता झालेल्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. लोक पीडित कुटुंबाला दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र अद्याप त्यांच्याबद्दल काहीच माहिती समोर आलेली नाही.