मराठी बातम्या /बातम्या /देश /

मसूद अजहर एक मुख्याध्यापकाचा मुलगा ते आंतरराष्ट्रीय दहशतवादी

मसूद अजहर एक मुख्याध्यापकाचा मुलगा ते आंतरराष्ट्रीय दहशतवादी

काही वर्ष अफगाणिस्तानमध्ये राहून तो पाकिस्तानात परतला होता. सुरुवातीला तो हरकत-उल-मुजाहिदीन (HuM) या दहशतवादी संघनेत सहभागी झाला होता.

काही वर्ष अफगाणिस्तानमध्ये राहून तो पाकिस्तानात परतला होता. सुरुवातीला तो हरकत-उल-मुजाहिदीन (HuM) या दहशतवादी संघनेत सहभागी झाला होता.

काही वर्ष अफगाणिस्तानमध्ये राहून तो पाकिस्तानात परतला होता. सुरुवातीला तो हरकत-उल-मुजाहिदीन (HuM) या दहशतवादी संघनेत सहभागी झाला होता.

नवी दिल्ली,01 मे : लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषीत करण्यात आलं आहे. संयुक्त राष्ट्र संघाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भारताच्या राजनैतिक रणनीतीचा मोठा विजय झाल्याचं मानलं जात आहे. फ्रान्सनं हा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला चीनने विरोध केला होता. पण त्यानंतर चीनने हा विरोध कमी केला. अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्याच्या निर्णयाला 151 देशांनी पाठिंबा दिला आहे.

मुख्याध्यापकाचा मुलगा ते जगातला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी

जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अझहर हा फक्त भारतालाच नाही तर सर्व जगातल्या अनेक देशांना हवा होता. अमेरिकेसह अनेक देश त्याच्या मागावर होते. मात्र तो कायम निसटत राहिला. भारताच्या IC 814 या विमानाच्या अपहरणानंतर भारतात त्याचं नाव सर्वांना माहित झालं.

पाकिस्तानातल्या बहावलपूर इथं 1968 मध्ये मसूदला जन्म झाला होता. मसूदला पाच भावंड असून सध्या ते सर्वच जण दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी आहेत. अफगाणास्तानात असलेल्या रशियन फौजांना हुसकावून लावण्यासाठी त्यावेळी जिहाद सुरू होता. त्यात  पाकिस्तानातून अनेक तरुण सहभागी झाले होते. त्यातलाच एक मसूद होता. मसूदचे वडिल बहावलपूरच्या सरकारी शाळेत मुख्याध्यापक होते. ते अतिशय धार्मिक प्रवृत्तीचे असल्याने मसूद धार्मिकतेकडून कट्टरतावादाकडे ओढला गेला.

अफगाणिस्तानात त्याला दहशतवादाचं सर्व प्रशिक्षण मिळालं होतं. काही वर्ष अफगाणिस्तानमध्ये राहून तो पाकिस्तानात परतला होता. सुरुवातीला तो हरकत-उल-मुजाहिदीन (HuM) या दहशतवादी संघनेत सहभागी झाला. तरुणांची डोकी भडकविण्यासाठी तो सदा-ए-मुजाहिद  हे मासिक चालवत असे.

पाकिस्तानात परतल्यानंतर काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाई करण्यासाठी त्याची निवड करण्यात आली. पोर्तुगालचा बनावट पासपोर्ट तयार करून तो पाकिस्तानातून बांगलादेशात गेला. त्यानंतर ढाक्यातून तो नवी दिल्लीला 29 जानेवारी 1993 ला भारतात आला.

नवी दिल्ली विमानतळावर सुरक्षा अधिकाऱ्यांनी जेव्हा त्याला हटकलं आणि विचारलं तू पोर्तुगालचा नागरीक वाटत नाही तेव्हा मसूदने त्यांना उत्तर दिलं की तो मुळचा गुजराती आहे. त्यानंतर तो भारतात दाखल झाला होता. काश्मीरसह देशभर त्याने जैश-ए-मोहम्मदचं जाळ तयार केलं होतं.

ब्रिटन, सोमालिया, पोर्तुगाल झांबीया अशा अनेक देशात जाऊन त्याने दहशतवादी संघटनांना मदत केली आणि तरुणांची डोकी भडकवली होती. ब्रिटनमध्ये राहून त्याने अनेकांना भडकविण्यांचा उद्योग सुरू केल्याने तो रडावर आला होता. याचा सुगामा लागताच त्याने ब्रिटनमधूनही काढता पाय घेतला.

First published:

Tags: Pakistan, Terrorism, Un