मुंबई, 28 मे : 'पाकिजा' फेम अभिनेत्री गीता कपूर यांनी वयाच्या 67व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मात्र त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कोण करणार असा प्रश्न कायम आहे. गीता यांचा मुलगा राजा 21 एप्रिल 2017 रोजी आपल्या वृद्ध आईला गोरेगावच्या एसआरव्ही रूग्णालयाच्या दरवाजात टाकून तिथून निघून गेला होता. त्यानंतर निर्माते रमेश तौरानी आणि अशोक पंडित यांनी पुढाकार घेऊन गीता यांची जबाबदारी घेतली.
मात्र उपचारासाठी दाखल झाल्यावर महिन्याभरापासून त्यांनी आपलं जेवण सोडून दिलं होतं. दिवस रात्र त्यांच्या तोंडी मुलगा राजाचंच नाव होतं. माझा राजा येणार असं त्या कायम म्हणायच्या.मात्र आज अखेर वृद्ध शरीराने साथ सोडली आणि त्यांचं निधन झालं.
#RIPGeetaKapoor Everyone around her tried their best to keep her healthy & happy. But there was always an inherent sorrow in her, longing for her children. We hope that her children return to bid her a final goodbye. pic.twitter.com/kWAfe4Plcz
— Ashoke Pandit (@ashokepandit) 26 May 2018
मात्र काल संध्याकाळी अचानक त्यांची मुलगी आंबोली पोलिस स्थानकात येऊन तिने हा मृतदेह ताब्यात देण्याची मागणी केली. मात्र आपण अंत्यसंस्कार एकट्याने करू सोबत कुणीही यायची गरज नाही अशी अट तिने ठेवली. अशोक पंडित यांनी तुम्ही आईला एकटं कसं सोडलंत असा प्रश्न विचारला असता तिने आई वृद्धाश्रमात आहे हे आपल्याला माहीत नव्हतं असं सांगितलं.
गीता यांचा मुलगा बॉलिवूडमध्ये कोरिओग्राफर असून मुलगी एअर होस्टेस आहे.ही घटना सोशल मीडियावर पसरल्यानंतर त्यांच्यावर नेटिझन्सनी प्रचंड टीका केलीय. मुलगा राजा याला बॉलिवूडमध्ये काम मिळू नये अशी मागणी काही नेटिझन्सनी केलीय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Died, Geeta kapoor, Pakizha