जाहिरात
मराठी बातम्या / देश / पाकच्या गोळीबारात नाशिकच्या जवानाला वीरमरण

पाकच्या गोळीबारात नाशिकच्या जवानाला वीरमरण

पाकच्या गोळीबारात नाशिकच्या जवानाला वीरमरण

केशव गोसावी हे २९ वर्षांचे होते. ते तालुका सिन्नर येथील श्रीरामपुर गावातील रहिवासी होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

    ११ नोव्हेंबर : पाकिस्तानने पुन्हा एकदा सीमारेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे. पाक सैनिकांच्या गोळीबारात महाराष्ट्राच्या जवानाला वीरमरण आले आहे. केशव सोमगिर गोसावी असं शहीद झालेल्या जवानाचं नाव आहे. केशव गोसावी हे नाशिक येथील रहिवासी होते. जम्मू काश्मीरमधील नौसेरा सेक्टरमध्ये आज दुपारी २.४५ मिनिटांच्या सुमारास पाक सैनिकांनी गोळीबार केला. या गोळीबारात केशव सोमगिर गोसावी जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी तातडीने सैन्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. केशव गोसावी हे २९ वर्षांचे होते. ते तालुका सिन्नर येथील श्रीरामपुर गावातील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी यशोदा गोसावी असा परिवार आहे. गोसावी हे सैन्याची बहाद्दूर सैनिक होते त्यांच्या जाण्याने सैन्याला तीव्र दु:ख झाले अशी भावना भारतीय लष्कराने व्यक्त केली. ================================

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: nashik , pak
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात