पोलिसांना जे जमले नाही ते TikTokमुळे शक्य, जया प्रदांच्या पतीचा लागला शोध!

पोलिसांना जे जमले नाही ते TikTokमुळे शक्य, जया प्रदांच्या पतीचा लागला शोध!

TikTokमुळे 3 वर्षे गायब असलेल्या व्यक्तीचा शोध घेणं पोलिसांना शक्य झालं आहे.

  • Share this:

चेन्नई, 04 जुलै : TikTokवर बंदी घाला अशी मागणी जोर धरत असताना या TikTokमुळे तीन वर्षे गायब असलेल्या व्यक्तीचा शोध लागलाआहे. विश्वास नाही ना बसत? तामिळनाडूमधल्या वेल्लुपूरम येथील ही घटना आहे. चक्क TikTokवरून गायब असलेल्या व्यक्तीला शोधण्यास पोलिसांना यश आलं आहे. 'द इंडियन एक्सप्रेस'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. सुरेश असं या व्यक्तीचं नाव असून घरात पत्नीशी झालेल्या वादानंतर नाराज होऊन सुरेशनं 2016मध्ये घर सोडलं होतं. त्यानंतर त्यानं एका कंपनीत काम सुरू केलं. पत्नी जया प्रदा यांनी पोलीस स्टेशनला तक्रार देखील दाखल केली. पण, पोलिसांना देखील सुरेशचा शोध लागला नाही. अखेर TikTokच्या माध्यमातून सुरेशला शोधण्यास पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांना समजूत काढल्यानंतर सुरेश घरी परतला आहे.

कसा लागला TikTokवरून शोध?

पत्नीशी झालेल्या भांडणानंतर सुरेशनं 2016मध्ये घरं सोडलं. सुरेश आणि जया प्रदा यांना दोन मुलं देखील आहेत. सुरेश गायब झाल्यानंतर जया प्रदा यांनी सर्व नातेवाईकांकडे चौकशी केली. पण, कुणालाही सुरेशबद्दल काहीच माहीत नव्हतं. अखेर जया प्रदा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पण, पोलिसांना देखील सुरेशचा शोध लागला नाही. एके दिवशी सुरेश आणि जया प्रदा यांच्या नातेवाईकानं TikTokवर एक व्हिडीओ पाहिला. या व्हिडीओमधील व्यक्ती आणि सुरेशमध्ये साम्य आढळून आलं. त्यानं तात्काळ ही गोष्ट जया प्रदा यांना सांगितली. जया प्रदा यांनी देखील या गोष्टीला पुष्टी देत पोलिसांशी संपर्क साधला.

या व्हिडीओमध्ये सुरेश सोबत एक Transgender व्यक्ती देखील दिसून येत होती. पोलिसांनी या कामी Transgender संघटनेची मदत घेत होसूर तेथे असलेल्या सुरेशचा शोध घेतला. होसूर येथे एका ट्रक्टर कंपनीत सुरेश मॅकेनिकलचं काम करत होता. या दरम्यान सुरेश आणि एका Transgenderचा संबंध आला. अखेर पोलिसांनी समजूत काढत सुरेशला घरी परतण्यास सांगितले. त्यानंतर सुरेश घरी परतला आहे.

VIDEO : सततच्या पावसामुळे सिल्लोडचा धबधब्याचा असा झाला जलप्रपात!

First published: July 4, 2019, 9:23 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading