जाहिरात
मराठी बातम्या / देश / Omicron च्या उद्रेकादरम्यान मोठी बातमी, Corona Virus कधी होणार सामान्य?; तज्ज्ञ म्हणतात...

Omicron च्या उद्रेकादरम्यान मोठी बातमी, Corona Virus कधी होणार सामान्य?; तज्ज्ञ म्हणतात...

Omicron च्या उद्रेकादरम्यान मोठी बातमी, Corona Virus कधी होणार सामान्य?; तज्ज्ञ म्हणतात...

काही महिन्यांपूर्वी आटोक्यात आलेल्या कोरोना व्हायरसचा (Corona virus) पुन्हा विस्फोट पाहायला मिळतोय. दक्षिण आफ्रिकेत नव्यानं सापडलेल्या ओमायक्रॉन (Omicron Variant) व्हेरिएंटचा उद्रेक झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 29 डिसेंबर: काही महिन्यांपूर्वी आटोक्यात आलेल्या कोरोना व्हायरसचा (Corona virus) पुन्हा विस्फोट पाहायला मिळतोय. दक्षिण आफ्रिकेत नव्यानं सापडलेल्या ओमायक्रॉन (Omicron Variant) व्हेरिएंटचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एकीकडे कोरोना (Covid-19)च्या वाढत्या रुग्णांमुळे जगभरातील लोकांची चिंता वाढत आहे. मात्र त्याच दरम्यान एक चांगली बातमी समोर आली आहे. त्याच वेळी, पुढील वर्षी एप्रिलपर्यंत सामान्य जीवन पूर्वीसारखे सुरू होऊ शकते, असा अंदाज आरोग्य तज्ज्ञांनी (Health Expert) व्यक्त केला आहे. आरोग्य तज्ज्ञांनी म्हटले आहे की, एप्रिलपर्यंत कोविड-19 कमकुवत होईल. पुढील वर्षी एप्रिलपर्यंत सामान्य जीवन पूर्वीसारखे सुरू होऊ शकते. एप्रिलपर्यंत कोरोनाचा धोका संपेल ईस्ट एंग्लिया (University of East Anglia) विद्यापीठातील मेडिसिनचे प्रोफेसर पॉल हंटर (Professor Paul Hunter) यांनी आज सकाळी बीबीसी ब्रेकफास्टवर एक धक्कादायक पण चांगली माहिती दिली आहे. ते म्हणाले की, कोरोनाचा प्रभाव भविष्यात संपणार आहे. हे सामान्य व्हायरस आणि रोगासारखे होईल. त्यानंतर असे मानले जात आहे की, नवीन वर्षापूर्वी इंग्लंडसाठी कोणतेही नवीन निर्बंध लागू होणार नाहीत आणि कदाचित त्यानंतरही लागू होणार नाहीत. कोविड-19 हे सामान्य सर्दी आणि खोकल्यासारखं असेल डेली स्टारमधील वृत्तानुसार, कामगारांना अलग ठेवल्यामुळे एनएचएस कर्मचार्‍यांच्या कमतरतेबद्दल बोलताना हंटर म्हणाले की, कोविड दूर होत नाही, कोविड दूर होत नाही आहे, हा फक्त एक व्हायरस आहे जो एप्रिल 2022 नंतर चिंतेचं कारण ठरणार नाही. त्यांनी दावा केला की, कोविड-19 हा एप्रिलनंतर सामान्य व्हायरस बनेल, जो सामान्य सर्दी- खोकल्याचं कारण बनेल. Omicron पासून कमी धोका ते म्हणाले की, ‘हा एक असा आजार आहे जो दूर होत नाही, संसर्ग दूर होत नाही, तरीही तो फार काळ गंभीर आजार म्हणून राहणार नाही’. कोरोनाच्या ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटबाबत बोलताना ते म्हणाले की, हा नवीन व्हेरिएंट डेल्टा पेक्षा जास्त संसर्गजन्य आहे. मात्र जोखमीच्या बाबतीत, ते आतापर्यंत डेल्टाच्या तुलनेत 50-70% कमी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात