मराठी बातम्या /बातम्या /देश /

Omicron चा विळखा, शाळेतील 29 विद्यार्थ्यांना Corona ची लागण: रिपोर्ट

Omicron चा विळखा, शाळेतील 29 विद्यार्थ्यांना Corona ची लागण: रिपोर्ट

काही महिन्यांपूर्वी आटोक्यात आलेला कोरोना व्हायरसनं (Corona Virus) पुन्हा एकदा डोकंवर काढलं आहे.

काही महिन्यांपूर्वी आटोक्यात आलेला कोरोना व्हायरसनं (Corona Virus) पुन्हा एकदा डोकंवर काढलं आहे.

काही महिन्यांपूर्वी आटोक्यात आलेला कोरोना व्हायरसनं (Corona Virus) पुन्हा एकदा डोकंवर काढलं आहे.

  • Published by:  Pooja Vichare

पश्चिम बंगाल, 23 डिसेंबर: काही महिन्यांपूर्वी आटोक्यात आलेला कोरोना व्हायरसनं (Corona Virus) पुन्हा एकदा डोकंवर काढलं आहे. कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन (Omicron) व्हेरिएंटमुळे कोरोना रुग्णांच्या आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यात आता लहान मुलांनाही कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण वाढलं आहे. पश्चिम बंगालमधील (West Bengal) नादिया जिल्ह्यातील एका निवासी शाळेतील किमान 29 विद्यार्थ्यांना कोरोना व्हायरसची (Coronavirus Cases)लागण झाली आहे. एका अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली.

अधिकाऱ्यानं सांगितलं की, जवाहर नवोदय विद्यालय, कल्याणीच्या इयत्ता 9वी आणि 10वीच्या 29 विद्यार्थ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली असून, त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना कळवण्यात आले आहे. संक्रमित विद्यार्थ्यांना खोकला आणि सर्दीची लक्षणे असल्याने त्यांना होम आयसोलेशनचा सल्ला देण्यात आला आहे.

हेही वाचा- आता गोळी खाऊन घरबसल्या करा कोरोनावर उपचार; मृत्यूचा धोका 90 टक्क्यांनी होणार कमी, इथे Paxlovid ला मंजुरी

 कल्याणी उपविभागीय अधिकारी (SDO) हिरक मंडळ म्हणाले की, शाळेतील इतर विद्यार्थी आणि शिक्षकांचीही कोविड-19 साठी (Covid-19 Test) तपासणी केली जात आहे. कोरोना व्हायरस Omicron च्या नवीन व्हेरिएंटमुळे देशात कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे.

भारतात ओमायक्रॉन या कोरोना व्हायरसचे नवीन व्हेरिएंटचे 213 प्रकरणे समोर आली आहेत, त्यापैकी 90 लोक संसर्गमुक्त झाले आहेत किंवा इतर ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. ही प्रकरणे 15 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोंदवली गेली आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सांगितले की दिल्लीत ओमायक्रॉन' व्हेरिएंटची सर्वाधिक 57 प्रकरणे आहेत. महाराष्ट्रात 54, तेलंगणात 24, कर्नाटकात 19, राजस्थानमध्ये 18, केरळमध्ये 15 आणि गुजरातमध्ये 14 आहेत.

24 तासांत 318 जणांचा मृत्यू

मंत्रालयाने सकाळी आठ वाजता जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात एका दिवसात कोविड-19 चे 6,317 नवीन रुग्ण आढळल्यानंतर, देशातील संक्रमितांची संख्या 3,47,58,481 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 78,190 वर आली आहे, जी 575 दिवसांतील सर्वात कमी आहे. आणखी 318 बाधितांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या 4,78,325 झाली आहे.

आकडेवारीनुसार, देशात सलग 55 दिवस कोविड-19 चे रोजचे रुग्ण 15 हजारांपेक्षा कमी आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 78,190 वर आली आहे, जी संसर्गाच्या एकूण प्रकरणांच्या 0.22 टक्के आहे. हा दर मार्च 2020 नंतरचा सर्वात कमी आहे. गेल्या 24 तासात कोविड-19 वर उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 907 ची घट नोंदवण्यात आली आहे. रूग्णांचा राष्ट्रीय रिकव्हरी दर 98.40 टक्के आहे, जो मार्च 2020 नंतरचा उच्चांक आहे.

हेही वाचा-  अगदी मग्न होऊन डीजेवर डान्स करत होते आजोबा; इतक्यात काठी घेऊन आल्या आजीबाई अन्..., मजेशीर VIDEO

 मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, दैनिक संसर्ग दर 0.51 टक्के नोंदवला गेला, जो गेल्या 79 दिवसांपासून दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे. साप्ताहिक संसर्ग दर 0.58 टक्के नोंदवला गेला, जो गेल्या 38 दिवसांपासून एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. देशात आतापर्यंत एकूण 3,42,01,966 लोक संसर्गमुक्त झाले आहेत आणि कोविड-19 मुळे मृत्यूचे प्रमाण 1.38 टक्के आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड-19 विरोधी लसींचे 138.96 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत.

First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus, Covid19