Home /News /national /

असं आहे नितीश कुमार यांचं मंत्रिमंडळ; नव्या चेहेऱ्यांना संधी, भाजपचा वरचष्मा

असं आहे नितीश कुमार यांचं मंत्रिमंडळ; नव्या चेहेऱ्यांना संधी, भाजपचा वरचष्मा

नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात भाजपचं वर्चस्व राहणार असल्याचे संकेत आहेत. महत्त्वाची खातीही मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

    पाटणा 16 नोव्हेंबर: नितीश कुमार बिहारचे सातवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली (Nitish Kumar takes oath as the CM of Bihar for the seventh time). राजभवनावर हा शपविधी सोहळा झाला. राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या शपथविधी समारंभाला उपस्थित होते. भाजपने नवी खेळी करत ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा पत्ता कट केला आहे. त्यांना दिल्लीत जबाबदारी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रिपदासाठी भाजपने तारकिशोर प्रसाद (Tarkishore Prasad) आणि रेणू देवी (Ranu Devi) यांची निवड केली आहे. नितीश कुमार यांच्यानंतर भाजपच्या तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनी शपथ घेतलीय. त्यानंतर जेडीयूच्या वतीने विजय चौधरी, विजेंद्र यादव, अशोक चौधरी, मेवालाल चौधरी, शीला कुमारी यांनी शपथ घेतली. शीला कुमारी या पहिल्यांदाच मंत्री झाल्या आहेत. हिंदुस्तानी आवाम मोर्चाच्या वतीने संतोष सुमन तर विकासशील इंसान पार्टीच्या वतीने मुकेश सहानी यांनी शपथ घेतली. तर भाजपच्या वतीने तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांच्याशिवाय  मंगल पांडेय, अमरेंद्र प्रताप, रामप्रीत पासवान, जीवेश कुमार, रामसूरत राय यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपच्या  वाटाघाटीमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महाराष्ट्रातल्या जागा वाटपापासून ते सत्तेतल्या वाटणीपर्यंत सगळा अनुभव पाठीशी असल्याने पक्षनेतृत्वाने फडणवीसांना ही मोठी जबाबदारी दिली होती. या निवडणुकीत NDAला 125 जागा मिळाल्या आहेत. त्यात भाजप 73, जेडीयू 43, हिंदुस्तान आवाम मोर्चा आणि विकास इंसाफ पार्टीला प्रत्येकी 4 जागा मिळाल्या आहेत. या पक्षांना त्यांना मिळालेल्या जागांप्रमाणे मंत्रिपदं देण्यात आली आहेत. RJD आणि काँग्रेससह महाआघाडीने या शपथविधी कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Bihar Election, Nitish kumar

    पुढील बातम्या