मुंबई : 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'चं 31 मार्च रोजी उद्घाटन करण्यात येत आहे. भारतीय संस्कृती आणि कलेसाठी नवी दालनं खुली होतील असा विश्वास नीता अंबानी यांनी व्यक्त केला आहे. उद्घाटनानिमित्त संपूर्ण 3 दिवसांचा ब्लॉकबस्टर शो असेल. यासाठी खास तिकीटं देखील आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यक्रमासाठी देश-विदेशातील कलाकारांसह बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील कलाकार उपस्थित राहणार आहेत. गुरुवारी, रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर, नीता अंबानी सांस्कृतिक केंद्रात पूजा केली. पूजेनंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आणखी एक स्वप्न साकार झालं. आपला सांस्कृतिक वारसा बहरेल असे ठिकाण आपल्याला निर्माण करायचे आहे.
या उद्घाटनाच्या निमित्तने खास 'स्वदेश' नावाचे विशेष कला आणि हस्तकला प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे. भारतातील परंपरेचं दर्शन घडवणारं हे प्रदर्शन असेल. 'संगम' नावाचा व्हिज्युअल आर्ट शोही आयोजित करण्यात आला आहे.
'या सांस्कृतिक केंद्राचे स्वप्न साकार करणे माझ्यासाठी एक आगळा वेगळा प्रवास आहे. सिनेमा असो वा संगीत, नृत्य असो वा नाटक, साहित्य असो वा लोककथा, कला असो वा हस्तकला, विज्ञान असो वा अध्यात्म. कल्चरल सेंटरमध्ये देशातील आणि जगातील सर्वोत्तम कला प्रदर्शने इथे होणार आहेत.
विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवेश, प्रेक्षक कोठे तिकीट खरेदी करू शकतात
नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात मुले, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना मोफत प्रवेश दिला जाईल. शाळा-महाविद्यालयीन कार्यक्रम असो किंवा कला-शिक्षक पुरस्कार कार्यक्रम असो किंवा गुरु-शिष्य परंपरा असो, केंद्र अशा सर्व कार्यक्रमांवर विशेष लक्ष देईल. केंद्राला भेट देणारे nmacc.com किंवा BookMyShow वरून तिकिटे खरेदी करू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nita Ambani, Reliance