Nirbhaya Justice LIVE : नराधमांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात
Nirbhaya Justice LIVE : नराधमांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात
निर्भयाचे चारही दोषी फाशीच्या शिक्षेतून सुटण्यासाठी अजुनही प्रयत्न करत होते. मात्र तीनही दोषींच्या फाशीच्या शिक्षेला स्थगितीचा अर्जाची याचिका फेटाळून लावली आहे. 7 वर्षांनंतर अखेर निर्भयाला न्याय मिळाला आणि चारही दोषी नराधमांना तिहार जेलमध्ये सकाळी 5.30 वाजता फाशी देण्यात आली. जल्लाद पवननं चारही आरोपींना फाशी दिली आहे.
निर्भयाच्या आरोपींना अखरे फाशी दिली. वेळ लागला पण सुयोग्य निर्णय घेतला गेला. न्याय मिळतो हा विश्वास लोकांच्या मनात निर्माण होईल. उशीर झाला पण निर्भयाच्या आरोपींना सर्वात कठोर शिक्षा झाली. अशी प्रतिक्रियाा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिली आहे.
6:13 (IST)
थोड्याच वेळात दोषींचं शवविच्छेदन होणार, दीनदयाल रुग्णालयात 5 डॉक्टरांची टीम 4 मृत नराधमांचं शवविच्छेदन करणार आहेत.
6:8 (IST)
फाशीनंतर दीनदयाल रुग्णालयातील डॉक्टरांनी नराधमांना मृत घोषित केलं आहे.
6:5 (IST)
मी माझ्या मुलीला वाचवू शकले नाही याचं दु:ख- आशा देवी
5:54 (IST)
निर्भयाला अखेर न्याय मिळाला, याचा आनंद आहे- निर्भयाचे वडील
नवी दिल्ली, 20 मार्च : निर्भयाचे चारही दोषी फाशीच्या शिक्षेतून सुटण्यासाठी अजुनही प्रयत्न करत होते. मात्र तीनही दोषींच्या फाशीच्या शिक्षेला स्थगितीचा अर्जाची याचिका फेटाळून लावली आहे. 7 वर्षांनंतर अखेर निर्भयाला न्याय मिळाला आणि चारही दोषी नराधमांना तिहार जेलमध्ये सकाळी 5.30 वाजता फाशी देण्यात आली. जल्लाद पवननं चारही आरोपींना फाशी दिली आहे.