नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी : देशाला हादरवणाऱ्या दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणात दररोज नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. सध्या निर्भया प्रकरणात डेथ वॉरंट बजावण्यासाठी पतियाळा हाऊस कोर्टात सुनावणी सुरू आहे. गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना कोर्टाचे वातावरण काही काळ तापले होते. निर्भयाच्या कुटुंबाचे वकील जितेंद्र झा यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, दोषी तुरूंगात आरामात आहेत आणि एन्जॉय करीत आहेत. हे ऐकताच दोषींचे वकील एपी सिंग यांनी निषेध व्यक्त केला. यावेळी कोर्टात दोन्ही वकिलामध्ये तू तू मै. मै. झाली. त्यानंतर न्यायाधीशांनी दोन्ही वकिलांना शांत राहण्याचं आवाहन केलं.
निर्भयाचे आई-वडीलाचे वकील जितेंद्र झा म्हणाले, तुरूंगात बसलेला गुन्हेगार आरामात आहे आणि कायद्याबरोबर खेळतो आहे. मृत्युदंड (Death warrant) जारी न केल्याने दोषी तुरूंगात एन्जॉय करीत आहेत. ते म्हणाले, जोपर्यंत त्यांना मृत्यू वॉरंट जारी होणार नाही तोपर्यंत दोषी स्पष्टपणे कायदेशीर पर्याय घेत राहतील आणि तुरुंगात आरामात राहतील. दोषी याच प्रकारे कायद्याबरोबर खेळत राहतील.
निर्भयाच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले, आज हे ठरविणे अत्यंत आवश्यक आहे की न्यायालयाने दोषींना taken as granted घेऊ द्यायला हवे की नवीन डेथ वॉरंट जारी करुन समाजासमोर एक उदाहरण द्यावे. वकील जितेंद्र झा यांची बाजू ऐकल्यानंतर दोषींच्या वकील एपी सिंह चिडले आणि म्हणाले, 6 जानेवारीपासून जेव्हा कोर्टात पुन्हा या प्रकरणाची सुनावणी होईल तेव्हापासून सर्वोच्च न्यायालय आणि पातियाळा हाऊस कोर्ट या प्रकरणाची सुनावणी करीत आहे. आणि दोषी तुरुंगात एन्जॉय करीत नसल्याचे ते म्हणाले,
निर्भयाच्या दोषींना 1 फेब्रुवारी रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात येणार होती. मात्र ऐनवेळी यात अडथळा आणत ही शिक्षा पुढे ढकलण्यात आली. दोषी स्वत:चा बचाव करण्यासाठी विविध पर्यायांचा अवलंब करीत आहेत. सध्याच्या परिस्थितीनुसार या चारही दोषींना वेगवेगळी शिक्षा होऊ शकते. निर्भयाच्या सामूहिक व बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कोर्टाला असेही सांगितले की निर्भय सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणात दोषी कायद्याचा आधार घेत शिक्षेची अंमलबजावणी करण्यास विलंब करीत आहेत. तर दुसरीकडे रेबेका जॉन म्हणाले की, दोषी मुकेशची याचिका मेरिटच्या आधारावर फेटाळण्यात आली आहे. दिल्लीच्या पातियाळा हाऊस कोर्टाकडून दोन वेळा डेथ वारंट जारी झाल्यानंतर फेटाळण्यात आलं आहे. दोषींच्या वकिलांनी दोषींचे वकील कायद्यातील डावपेच खेळत असल्याने दोषींची फाशी पुढे ढकलली जात आहे. निर्भयाच्या दोषींना कायदेशीर मदत मिळत असल्याने किंवा ते पुरेपूर कायद्याचा उपयोग करीत असल्याने त्यांची फाशी पुढे ढकलली जात आहे. दोषींच्या वकिलांकडून त्यांचा बचाव करण्यासाठी कायदेशीर पर्यायांचा अवलंब केला जात आहे.