मराठी बातम्या /बातम्या /देश /

निर्भया केसमुळे या भयंकर गँग रेपच्या खटल्यालाही मिळालं नवं वळण!

निर्भया केसमुळे या भयंकर गँग रेपच्या खटल्यालाही मिळालं नवं वळण!

दिल्लीतल्या अत्यंत भयंकर निर्भया प्रकरणाला (Nirbhaya Case) या 16 डिसेंबरला 8 वर्षं पूर्ण झाली. हे प्रकरण उघडकीस आलं आणि देश पेटून उठला होता. या दबावामुळे आणखीही एक बलात्काराचा खटला उजेडात आला, त्याची ही कहाणी

दिल्लीतल्या अत्यंत भयंकर निर्भया प्रकरणाला (Nirbhaya Case) या 16 डिसेंबरला 8 वर्षं पूर्ण झाली. हे प्रकरण उघडकीस आलं आणि देश पेटून उठला होता. या दबावामुळे आणखीही एक बलात्काराचा खटला उजेडात आला, त्याची ही कहाणी

दिल्लीतल्या अत्यंत भयंकर निर्भया प्रकरणाला (Nirbhaya Case) या 16 डिसेंबरला 8 वर्षं पूर्ण झाली. हे प्रकरण उघडकीस आलं आणि देश पेटून उठला होता. या दबावामुळे आणखीही एक बलात्काराचा खटला उजेडात आला, त्याची ही कहाणी

नवी दिल्ली, 16 डिसेंबर : ‘यानीच तुझ्यावर बलात्कार केला होता का?,’ कोर्टात एका मुलीला हा प्रश्न विचारला जात होता. तिच्यासमोर उभार होता मोठ्या मिशा असलेला, अंगापिंडानी दणकट आणि चेहऱ्यावर जन्मजात माज असलेला एक पुरुष. मुलीला हे आठवत होतं की तिच्यावर बलात्कार करणाऱ्या मुलाला मिशा नव्हत्या, तो दणकटही नव्हता पण चेहरा आणि अंगकाठी हीच होती. पण तिनं क्षणभर त्याच्या डोळ्यांत बघितलं आणि तिला आठवलं की तिच्यावर बलात्कार करणारा तोच होता. ती घटना डोळ्यांसमोर सर्रकन गेली आणि मुलीला उलटी झाली. हातपाय गाळून ती कोर्टात चक्कर येऊन पडली. तिच्या तब्येतीची दखल घेऊन फास्ट ट्रॅक कोर्टानी (Fast Track Court) सुनावणी पुढे ढकलली गेली. कोर्टात बेशुद्ध झालेली नफिसा (नाव बदललं आहे) आता तिच्या घरात होती आणि तिच्या डोळ्यांसमोर तो प्रसंग गेल्या 10 वर्षांपासून म्हणजे 2005 पासून थैमान घालत होता. ती संध्याकाळ किती रम्य होती? तेव्हा 13 वर्षांची नफिसा घरोघरी धुण्याभांड्याची कामं करायची. 2 मेला ही कामं उरकून तिला घरी जायचं होतं. त्या कॉलनीच्या पलीकडे असलेल्या झोपडपट्टीत ती राहत होती. पण अचानक पाऊस सुरू झाला त्यामुळे ती पावसाची वाट पाहत थांबली. तिच्यासोबत तिचा लहान भाऊही होता. त्याला पावसात भिजायचं होतं आणि तिच्याही मनात पावसाचा आनंद लुटावा असं आलं त्यामुळे नफिसा घरातल्या काकूंना सांगून पाऊस सुरू असतानाच निघाली. आशियाना परिसरातून ती जात असताना अंधार पडला होता. पावसामुळे रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. नागेश्वर मंदिराजवळ एक टिंटेड ग्लास असलेली कार लाइट मारत हॉर्न वाजवत नफिसाच्या दिशेनी आली. नफिसा आणि तिचा भाऊ बाजूला झाले. कार पुडे जाऊन थांबली. त्यातून दोन तरुण मुलं बाहेर आली त्यांनी नफिसाच्या भावाला लांब फेकून दिलं आणि तिला उचलून गाडीत टाकून घेऊन गेले. ती रात्र किती भयानक होणार होती ? चालत्या कारमधून ओरडणाऱ्या नफिसाला शांत करण्यासाठी त्यांनी सिगरेट आणि लायटरचे चटके दिले. तरीही ऐकत नाही पाहून तिला बंदूकीनी ठार मारण्याची धमकी दिली. तरीही ती ओरडत राहिल्याने तिला बेदम मारहाण केली आणि तिच्यावर बलात्कार केला. काही वेळाने एका सुनसान ठिकाणी मोकळ्या प्लॉटवर कार पोहोचली. नफिसाला फरफटत त्या प्लॉटवर नेऊन एका लाकडी ओंडक्याला बांधून तिच्यावर त्या दोघांनी आळीपाळीने बलात्कार केला. रक्तबंबाळ नफिसा मेली असं समजून तिला डालीगंज पूलाजवळ फेकून देऊन मुलं पळून गेली. तिला तिथं टाकून पळण्याआधी एकानी तिची ‘कमाई’ म्हणून 20 रुपयांची नोट तिच्या अंगावर फेकली होती. काही वेळानी तिथून जाणाऱ्या बायाकांनी नफिसाला पाहिलं पण रक्तबंबाळ आणि अंगावरच्या कपड्यांच्या चिंध्या पाहून त्या बायकांना ती हडळ वाटली आणि त्या निघून जायला लागल्या. इतक्यात नफिसा रस्त्यावर कोसळली मग त्या बायकांनी जवळ जाऊन तिची चौकशी केल्यावर तिची ओळख पटली. नफिसाची अवस्था पाहून पोलीस अधिकारी आर. के. एस. राठोड यांना नफिसावर काय अत्याचार झालेत याची कल्पना आली होती. नफिसाचे वडिल सबरुद्दीन यांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी नफिसाला लेडी डॉक्टरांकडे तपासणीला पाठवेपर्यंत तिच्या शरीरातून रक्तस्राव सुरूच होता. खटल्यात इथं आली अडचण नफिसाच्या खासगी अवयवांवरही जखमा झाल्याचं वैद्यकीय तपासात लक्षात आलं पण तरीही तिच्यावर बलात्कार झाला असा रिपोर्ट डॉक्टरांनी दिला नाही. गुन्हा दाखल झाला, कायदेशीर कारवाई सुरू झाली. बरी झाल्यावर हॉस्पिटलमधून घराच्या चार भिंतींत कोंडली गेली. ज्यांच्याविरुद्ध हा खटला होता ते लखनौमधलं मोठं घराण होतं आणि त्या भागातले गुंड होते. त्यांच्या कुटुंबातलं कुणी राजकीय नेता होत तर कुणी सुप्रसिद्ध वकील, कुणी सरकारी यंत्रणेत काम करत होतं. आरोपीची तब्येत खराब नसणं आणि इतर कारणांनी खटल्याच्या सुनावणीच्या तारखांवर तारखा पडत राहिल्या. वर्षं उलटली दुसरीकडे नफिसाचं शिक्षण थांबलं होतं तिनी हिमतीनी शाळेत नववीत प्रवेश घेतला तर वर्गातल्या मुलींनी तिला ‘रेप रेप’ असं चिडवल्याने पुन्हा शाळा सोडून नफिसाला घरात कोंडून घ्यावं लागलं. दिल्लीतील निर्भयाच्या खटल्यानंतर परिस्थिती बदलली दरम्यानच्या काळात आरोपी गौरव शुक्ला हा गुन्हा घडला तेव्हा 10 वीत होता असं मार्कशीट दाखवून कोर्टासमोर सांगण्यात आलं त्यामुळे त्याला अल्पवयीन करण्याचा प्रयत्न झाला. नंतर त्याचं धूमधडाक्यात लग्न झालं. इकडे नफिसाचं कुटुंब न्यायाची वाट पाहत राहिलं. 2012 मध्ये दिल्लीत चालत्या बसमध्ये कॉलेजमधील मुलीवर सामूहिक बलात्कार झाला त्यामुळे संपूर्ण देश हादरला. या निर्भया खटल्यानंतर बलात्काराशी संबंधित कायदे कठोर झाले आणि या प्रकरणांच्या सुनावणीसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू झाली. कठोर शिक्षांचीही तरतूद झाली. नफिसाच्या कुटुंबाला आशा वाटली. निकालाआधी अनेक कलाटण्या मिळाल्या निर्भया हत्याकांडानंतर गौरव शुक्ला खटला गतीने चालवण्याची मागणी झाली आणि 2015 मध्य नफिसाची केस फास्ट ट्रॅक कोर्टासमोर आली. गौरवच्या वकिलांनी कायद्यातील क्लृप्त्या वापरून निकाल लांबवण्याचा प्रयत्न केला. नफिसाला आता न्याय मिळेल अस वाटत असतानाच खटल्याला कलाटणी मिळाली. मे 2015 मध्ये शुक्लाविरुद्धच्या कोर्टातील फायली अचानकच गायब झाल्या. परत अनेक महिने उलटले. डिसेंबर 2015 मध्ये कोर्टानी नफिसाला सांगितलं की आरोपीला कोर्टासमोर ओळख. पण नफिसाला प्रश्नच पडला कारण जेव्हा तिच्यावर बलात्कार झाला होता तेव्हा कोवळा मुलगा असलेला गौरव आता एका मुलाचा बाप झाला होता. त्याचा चेहरा बदलला होता. तरीही त्याच्या डोळ्यांवरून नफिसानी गौरवला कोर्टात ओळखलं आणि ती तिथंच कोसळली.  2016 मध्ये गौरवनी कोर्टात सादर केलेली 10 वीची मार्कशीट खोटी असल्याचं सिद्ध झालं. त्यामुळे हे सिद्ध झालं की दुष्कृत्य करताना तो अल्पवयीन नव्हता. बलात्कारानंतर तब्बल 11 वर्षांनी म्हणजे एप्रिल 2016 ला गौरव शुक्लाला दोषी ठरवून कोर्टाने 10 वर्षांची शिक्षा ठोठावली. आशियाना सामूहिक बलात्कार प्रकरण म्हणून प्रसिद्ध या प्रकरणातील गौरवचे साथीदार भरतेंदू आणि अमन यांना आधीच शिक्षा झाली होती. या निकालानंतर माध्यमांशी बोलताना नफिसाने म्हटलं होतं की तिला जज व्हायची इच्छा होती. (ही बातमी 2018 मध्ये पहिल्यांदा प्रसिद्ध झाली होती, प्रसंगानुरूप काही बदल करून ती पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.)
First published:

Tags: Nirbhaya gang rape case

पुढील बातम्या