मराठी बातम्या /बातम्या /देश /त्यांना घडवायचा होता चालत्या ट्रेनमध्ये स्फोट, दोन सख्ख्या भावांना NIA कडून अटक

त्यांना घडवायचा होता चालत्या ट्रेनमध्ये स्फोट, दोन सख्ख्या भावांना NIA कडून अटक

बिहारमधील दरभंगा रेल्वे स्थानकावर 17 जून रोजी झालेल्या ‘पार्सल ब्लास्ट’ प्रकरणात एनआयएच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. या प्रकऱणात हैदराबादमधील दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे.

बिहारमधील दरभंगा रेल्वे स्थानकावर 17 जून रोजी झालेल्या ‘पार्सल ब्लास्ट’ प्रकरणात एनआयएच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. या प्रकऱणात हैदराबादमधील दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे.

बिहारमधील दरभंगा रेल्वे स्थानकावर 17 जून रोजी झालेल्या ‘पार्सल ब्लास्ट’ प्रकरणात एनआयएच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. या प्रकऱणात हैदराबादमधील दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे.

हैदराबाद, 1 जुलै: बिहारमधील दरभंगा रेल्वे स्थानकावर (Darbhanga Railway Station) 17 जून रोजी झालेल्या ‘पार्सल ब्लास्ट’ (Parcel Blast) प्रकरणात एनआयएच्या (National Investigation Agency) हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. या प्रकऱणात हैदराबादमधील दोन सख्ख्या भावांना (Two brothers) अटक करण्यात आली असून या दोघांचा संबंध पाकिस्तानमधील दहशतादी संघटनांशी (Terrorist organization) असल्याचा संशय एनआयएनं व्यक्त केला आहे.

हैदराबादमधून इमरान खान उर्फ इमरान मलिक आणि नासिर खान उर्फ नासिर मलिक या सख्ख्या भावांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तेलंगणा पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एनआयएनं ही कारवाई केली. पाकिस्तानमधील ‘लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनांशी या दोघांचा संबंध असून पाकिस्तानमधून येणाऱ्या सूचनांच्या आधारे त्यांनी स्फोटकं रेल्वे स्टेशनवर पोहोचवण्याचं काम केल्याचा संशय आहे.

चालत्या रेल्वेत स्फोट घडवून अधिकाधिक लोकांना टार्गेट करण्याचा त्यांचा डाव होता. त्यासाठी एका कपड्याच्या बॅगेत काचेच्या बाटलीतून 100 मिली लिक्विड एलईडी त्यांनी भरलं होतं. मात्र चालत्या रेल्वेत स्फोट न झाल्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. अटक झालेल्यांपैकी नासिर मलिक हा आयईडीचा वापर करून स्फोट घडवण्यात माहिर असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

हे दोन भाऊ पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांशी संबंधित असून देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याची टीप तेलंगणा पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या दोघांवर पाळत ठेवली होती. नासिर मलिक 2012 साली पाकिस्तानमध्ये जाऊन आल्याचे पुरावेदेखील तेलंगणा पोलिसांना सापडले आहेत. तिथेच आयईडीचा स्फोट करण्याचं प्रशिक्षण त्यानं घेतलं असावं, असा पोलिसांचा कयास आहे.

स्फोटाचं उत्तर प्रदेश कनेक्शन

दरभंगा एक्सप्रेसमध्ये स्फोट घडवण्याच्या योजनेचा मूळ सूत्रधार असणाऱ्या सलीम नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी उत्तर प्रदेशमधून अटक केली होती. दरभंगा स्फोटाची जबाबदारी आयएसआयनं सलीमला दिली होती. मग सलीमनं हैदराबादमध्ये राहणाऱ्या या दोन भावांना त्या कटात सहभागी करून घेतलं. अटक करण्यात आलेलेल हे दोन भाऊ यापूर्वी सिमी नावाच्या संघटनेतही कार्यरत होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.

हे वाचा -भारताच्या दणक्याने उघडले युरोपचे डोळे, 7 देशांची Covishield ला मान्यता

लेडिज सूटमुळे मिळाले नवे धागेदोरे

ज्या बॅगेत हा स्फोट झाला, त्यात काही लेडिज सूट ठेवण्यात आले होते. या सूटचा पोलिसांनी तपास केला आणि नेमके कुठून ते शिवले, याची माहिती घेतली. उत्तर प्रदेशातील शामली भागातच हे सूट शिवल्याचं तपासात समोर आलं. याप्रकरणी लेडिज सूट विकणाऱ्या काहीजणांची नावं पोलिसांना मिळाली असून त्यांची चौकशी सुरू आहे. मात्र या लेडिज सूटमुळे स्फोटाचं कनेक्शन उत्तर प्रदेशशी असल्याचं समोर आलं होतं.

या दोघांना आता रिमांडवर बिहारला आणलं जाणार असून पटनातील एनआयच्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

First published:

Tags: Bomb Blast, Hyderabad, India, Terror group