जाहिरात
मराठी बातम्या / देश / राम मंदिर उभारणीत पुन्हा नवं संकट; पायाभरणीला 5 महिने उलटून गेले तरी...

राम मंदिर उभारणीत पुन्हा नवं संकट; पायाभरणीला 5 महिने उलटून गेले तरी...

राम मंदिर उभारणीत पुन्हा नवं संकट; पायाभरणीला 5 महिने उलटून गेले तरी...

राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस आणि विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष चंपत राय यांनी चिंता व्यक्त केली आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्‍ली, 4 जानेवारी : अयोध्‍येतील (Ayodhya) राम मंदिर उभारणीठी (Ram Temple) जमिनीच्या पायाभरणीला तब्बल 5 महिने उलटून गेले आहेत. यादरम्यान राममंदिर उभारण्यात अनेक समस्या येत आहेत. त्यामुळे अद्याप पाया घालण्याचे काम झालेले नाही. दरम्यान राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस आणि विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष चंपत राय यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, राम मंदिर उभारण्यात अनेक अडचणी येत आहेत. उभारणीच्या ठिकाणच्या जमिनीमुळे येथे उभारणी करण्यास अडथळा येत आहे. चंपत राय यांच्या मते, ज्या दिवशी मंदिराचे बांधकाम सुरू होईल, त्या दिवसापासून 36 ते 39 महिन्यांच्या आत राम मंदिर तयार होईल. हे मंदिर पूर्णपणे दगडांनी बनलेले असेल. मंदिराच्या शिखरावरुन संपूर्ण मंदिरापर्यंत सुमारे चार लाख घनमीटर दगड वापरला जाईल. तसेच जूनमध्ये मंदिराचे बांधकाम सुरू होईल असा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. परंतू अद्याप जमिनीचा अभ्यास पूर्ण झालेला नाही. बांधकाम साइटवरील जमीन फारच भुसभुशीत आहे. ही एक मोठी समस्या आहे. चंपत राय यांनी वृत्तसंस्थेतील एएनआयला सांगितले की राम मंदिराचा पाया तयार करण्यासाठी कंक्रीट व दगडांचा उपयोग लोखंड नव्हे तर वापरला जाईल. हे दगड एकत्र बांधण्यासाठी तांबे वापरला जाईल. मंदिराच्या बांधकामात चांदी वापरण्याची गरज नाही. चंपत राय यांनी हे मंदिर 360 फूट लांब आणि 235 फूट रुंद असल्याचे सांगितले. मंदिराची उंची 161 फूट असेल. मंदिरात 3 मजले असतील. मंदिराच्या संरचनेत वृद्ध आणि अपंगांसाठी स्वतंत्र रचना तयार करण्यात येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: RamMandir
  • First Published :
जाहिरात
जाहिरात