नवी दिल्ली, 21 जानेवारी: पाच वर्षाखालील मुलांना मास्क घालण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे, कोरोना संसर्गाची (Corona Infection) तीव्रता लक्षात न घेता, 18 वर्षांखालील मुलं आणि किशोरवयीन मुलांसाठी अँटीव्हायरल किंवा मोनोक्लोनल अँटीबॉडीज वापरण्याची शिफारस केलेली नाही. स्टिरॉइड्स वापरल्यास ते 10 ते 14 दिवसांसाठी डायल्टूट केले पाहिजेत. केंद्र सरकारने गुरुवारी ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.
केंद्र सरकारने गुरुवारी सांगितले की, 18 वर्षांखालील रुग्णांसाठी अँटीव्हायरल (Antivirals) आणि मोनोक्लोनल अँटीबॉडीजची (Monoclonal Antibodies) गरज नाही. केंद्रानं म्हटले आहे की, कोविड संसर्गाची तीव्रता लक्षात न घेता आणि स्टिरॉइड्सचा वापर केल्यास ते 10 ते 14 दिवसांत कमी केले जावे. 18 वर्षाखालील मुले आणि पौगंडावस्थेतील कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी सुधारित व्यापक मार्गदर्शक तत्त्वे' मध्ये, आरोग्य मंत्रालयाने असंही म्हटलं आहे की, पाच वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी मास्क घालण्याची शिफारस केलेली नाही.
वन-डे नंतर टेस्ट टीमच्या कॅप्टन पदावरूनही होणार होती विराटची हकालपट्टी!
मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असं म्हटलं आहे की, 6-11 वर्षे वयोगटातील मुले त्यांच्या स्वत: च्या सुरक्षेसाठी आणि पालकांच्या योग्य देखरेखीखाली त्यांच्या क्षमतेनुसार मास्कचा योग्य वापर करू शकतात. 12 वर्षाखालील आणि त्यावरील मुलांनी प्रौढांप्रमाणे मास्क घालण्याच्या नियमांचे पालन केले पाहिजे. ओमायक्रॉनमुळे कोविड प्रकरणांची नवीन लाट लक्षात घेता, केंद्राच्या तज्ज्ञांनी या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा केली आहे.
लक्षणांवर आधारित औषधोपचार सूचना
इतर देशांमधील उपलब्ध डेटा सूचित करतो की, ओमायक्रॉनने रोगाची तीव्रता कमी केली आहे. दरम्यान नवीन लाट सुरू असताना त्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. यात लक्षणे नसलेली, सौम्य, मध्यम आणि गंभीर अशी प्रकरणे वर्गीकृत केली आहेत.
मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोविड-19 हा विषाणूजन्य संसर्ग आहे आणि जटिल कोविड संसर्गाच्या व्यवस्थापनात प्रतिजैविकांची भूमिका नाही. मंत्रालयाने म्हटले आहे की, लक्षणे नसलेल्या आणि सौम्य लक्षणे असलेल्या प्रकरणांमध्ये थेरपी किंवा रोगप्रतिबंधक औषधांची शिफारस केली जात नाही. संसर्गाचा संशय नसल्यास मध्यम आणि गंभीर प्रकरणांमध्ये प्रतिजैविक औषधे लिहून दिली जाऊ नयेत.
झोपेतच केला घात; पत्नीने अपंग पतीला दिला भयंकर मृत्यू, कोल्हापुरला हादरवणारी घटना
त्याचवेळी केंद्रानं 12-14 वर्षे वयोगटातील मुलांना अँटी-कोविड-19 लस देण्याच्या संदर्भात म्हटले आहे की, हा निर्णय वैज्ञानिक पुराव्याच्या आधारे घेतला जाईल आणि या संदर्भात चर्चा सुरू आहे. नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही.के. पॉलने साप्ताहिक पत्रकार परिषदेत एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की, जर एखाद्याला कोरोना व्हायसरची लागण झाली असेल तर ते तीन महिन्यांनंतर दुसरा किंवा बूस्टर डोस घेऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Face Mask