'मैं ईश्वर की शपथ लेता हूं कि...', नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान

'मैं ईश्वर की शपथ लेता हूं कि...', नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान

नरेंद्र मोदी यांनी देशाच्या पंतप्रधान पदाची सलग दुसऱ्यांदा शपथ घेतली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 मे : राजधानी नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाचा शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.  नरेंद्र मोदी हे देशाच्या पंतप्रधानपदी सलग दुसऱ्यांदा विराजमान झाले आहेत. 'मैं नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं की...'असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यासाठी देश-परदेशातून तब्बल 8 हजार पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले होते. बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ, भूतान यांचा समावेश असलेल्या ‘बिमस्टेक’ देशांचे प्रमुख उपस्थित होते. शिवाय, सिनेसृष्टीतील तारे-तारकांनीही सोहळ्याला हजेरी लावली. संध्याकाळी जवळपास 7 वाजता सुरू झालेल्या शपथविधी सोहळ्याची सांगता रात्री 8.05 वाजता करण्यात आली.

या सोहळ्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि अन्य दिग्गजही उपस्थित होते.

ममता बॅनर्जी गैरहजर

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला हजर न राहण्याचा निर्णय घेतला होता. 'शपथविधीला हजर राहणार होतो. पण प्रसारमाध्यमांतील वृत्ताद्वारे शपथविधी सोहळ्यासाठी पश्चिम बंगालमधील हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांनाही निमंत्रण दिल्याचं समजलं. या हत्यांना तृणमूल काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आल्यानं आपण शपथविधी सोहळ्याला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला', असे ममता बॅनर्जींनी सांगितलं

पाकिस्तानला निमंत्रण नाही

दरम्यान, 2014मध्ये पाकिस्तानचे तत्कालिन पंतप्रधान नवाज शरीफ यांनी निमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्यानं यावेळेस पाकिस्तानला वगळण्यात आलं.

VIDEO : नरेंद्र मोदी घेतली सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ


टीम नरेंद्र मोदींचा भव्य शपथविधी सोहळा

1.राजनाथ सिंह
2.अमित शहा
3.नितीन गडकरी
4.डी.व्ही.सदानंद गौडा


5.निर्मला सीतारमण


6.रामविलास पासवान
7. रविशंकर प्रसाद


8.हरसिम्रत कौर बादल
9.थावरचंद गेहलोत


10.एस .जयशंकर
11.रमेश निशंक


12.अर्जुन मुंडा


13. स्मृती इराणी
14. डॉ. हर्ष वर्धन15. प्रकाश जावडेकर
16. पियूष गोयल


17.धर्मेंद्र प्रधान18. मुख्तार अब्बास नक्वी19. प्रल्हाद जोशी20. महेंद्रनाथ पांडे

21 . अरविंद सावंत

22 गिरीराज सिंह23.गजेंद्रसिंह शेखावत24. संतोष गंगवार25.राव इंद्रजित सिंह26. श्रीपाद नाईक27.डॉ. जितेंद्र सिंग28. किरण रिजीजू


29. प्रल्हाद पटेल, भाजप


30. राजकुमार सिंग


31.हरदीप सिंग पुरी


32. मनसुखी मांडवीय


33. फग्गनसिंह कुलस्ते


34. अश्विनीकुमार चौबे


35. अर्जुन राम मेघवाल


36. व्ही.के.सिंग


37. कृष्णपाल गुर्जर

38. रावसाहेब दानवे


39. किशन रेड्डी


40. पुरुषोत्तम रुपाला41. रामदास आठवले42. साध्वी निरंजन ज्योती43.बाबुल सुप्रियो44.संजीव बलियान45.संजय धोत्रे46.अनुरागसिंग ठाकूर47. सुरेश बसप्पा

48. नित्यानंद राय49.रतनलाल कटारिया50.व्ही. मुरलीधरन51. रेणुका सिंह सरूता52.सोम प्रकाश53.रामेश्वर तेली54.प्रतापचंद्र सरंगी55. कैलाश चौधरी

56.देबोश्री चौधरी

शरद पवार काँग्रेसचे नवे अध्यक्ष? राहुल गांधींसोबतच्या भेटीचा EXCLUSIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2019 07:09 PM IST

ताज्या बातम्या