नवी दिल्ली, 07 फेब्रुवारी: आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, कोणाची सत्ता येणार, कोण पंतप्रधान होणार याचा शोध घेण्यासाठी अनेक सर्व्हे केले जात आहेत. काही जण ज्योतिषांकडे जात आहेत. निवडणुकीच्या निकालासंदर्भात अनेक जण स्वत:चे अंदाज व्यक्त करत आहेत. अशातच मार्केट गुरु अशी ओळख असलेल्या राकेश झुनझुनवाला यांनी लोकसभा निवडणुकीत कोण सत्तवर येणार याचा अंदाज वर्तवला आहे. भाजप येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सर्वांना धक्का बसेल अशी कामगिरी करेल असे झुनझुनवाला यांनी टायटॉन परिषदेत बोलताना सांगितले. स्वातंत्र्यानंतर प्रत्येक दशकात भारताचा विकास दर उंचावला. व्यवस्थेत जेव्हा उलथापालथ होते तेव्हाच विकास आणि समृद्धी होते, भारत आणि अमेरिकेत असंच झाले होते, असे ते म्हणाले. भारताच्या विकासात लोकशाही, उद्यमशीलता आणि नैसर्गिक संपत्ती याचे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे तीन राज्यात भाजपचा पराभव झाल्यानंतर झुनझुनवाला यांनी भाजपची पाठराखण केली होती. त्यांच्यामते विधानसभेचे निकाल भाजपसाठी इतके देखील वाईट नव्हते जितके सांगितले गेले, असे ते म्हणाले होते. VIDEO : सांगलीत धूम स्टाईल रिक्षांचा थरार; क्षणाक्षणाला होता-होता टळले अपघात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.