
पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी क्रूझमधून जात असताना नदीच्या दुतर्फा नागरिकांनी जोरदार गर्दी केली होती. पंतप्रधान मोदींनी हात हलवून लोकांच्या अभिवादनाचा स्वीकार केला. यावेळी पंतप्रधानांनी कालभैरव मंदिरात पूजा केली आणि गंगेत स्नानही केलं.

आपल्या लोकसभा मतदारसंघात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी क्रूझमधून रविदास घाटावरही गेले. संत रविदास यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांनी अभिवादन केलं. त्यानंतर संध्याकाळच्या आरतीसाठी ते रवाना झाले.

गंगास्नानानंतर पंतप्रधान मोदी हे गंगाजल घेऊन काशी विश्वनाथ मंदिरात पोहोचले आणि त्यांनी जलाभिषेक केला. यावेळी देशभरातून आलेले साधूसंत उपस्थित होते.

वाराणसीत दाखल झाल्यानंतर पंतप्रधानांनी भगवी वस्त्रं परिधान केली. गंगा नदीच्या प्रवाहात बराच वेळ पंतप्रधान उभे होते. यावेळी कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती.

नागरिकांना अनेक गल्ल्यांमधून फिरत मंदिरात दर्शनासाठी यावं लागत होतं. मात्र आता थेट मंदिरात प्रवेश मिळणार आहे.




