मराठी बातम्या /बातम्या /देश /

Omicron Sub-Variant : दिल्लीत ओमिक्रॉनचा नवीन सब-व्हेरियंट; लस घेतलेल्यांनाही करतोय बाधित

Omicron Sub-Variant : दिल्लीत ओमिक्रॉनचा नवीन सब-व्हेरियंट; लस घेतलेल्यांनाही करतोय बाधित

दिल्लीत कोरोना संसर्ग झपाट्याने पसरत असून यामागे नवीन व्हेरियंट असल्याचे अहवालात समोर आले आहे.

दिल्लीत कोरोना संसर्ग झपाट्याने पसरत असून यामागे नवीन व्हेरियंट असल्याचे अहवालात समोर आले आहे.

दिल्लीत कोरोना संसर्ग झपाट्याने पसरत असून यामागे नवीन व्हेरियंट असल्याचे अहवालात समोर आले आहे.

    नवी दिल्ली, 10 ऑगस्ट : गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणू संसर्ग आपली पाठ सोडायला तयार नाही. आतापर्यंत या संसर्गाच्या दोनतीन लाटा येऊन गेल्या आहेत. यात मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली. काही दिवसांपूर्वीच कोरोना लाट ओसरली असं वाटत असतानाच आता पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढत आहे. अशा परिस्थितीत राजधानी दिल्लीत कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा नवीन सब-व्हेरियंट आढळला आहे. दिल्लीतील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होण्याचे हा नवीन सब-व्हेरियंट असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता प्रशासन अलर्ट मोडवर गेले आहे. कोरोनाचे नवीन प्रकार दिल्लीतील लोकांना झपाट्याने वेढत असल्याचे अहवालात समोर आले आहे. दिल्लीच्या लोकनायक जयप्रकाश हॉस्पिटलच्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉनच्या नवीन प्रकाराचे नाव BA,2.75 आहे. अहवालात असे आढळून आले की ओमिक्रॉनच्या एका उप-प्रकारात संक्रमणाचे प्रमाण जास्त आहे. LNJP हॉस्पिटलच्या प्रयोगशाळेत 90 कोरोनाबाधित लोकांच्या नमुन्याच्या जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये नवीन प्रकार आढळून आला आहे. अहवालात असे दिसून आले आहे की कोरोनाचे नवीन उप-प्रकार अतिशय वेगाने पसरतो. ज्या लोकांच्या शरीरात आधीच अँटीबॉडीज आहेत किंवा ज्यांनी कोरोनाची लस घेतली आहे अशा लोकांवरही या प्रकाराचा परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. वाचा - अनेक राज्यांमध्ये डायरियाचा उद्रेक, आजार होऊ नये यासाठी 'या' गोष्टी टाळा कोरोना, मंकीपॉक्स आता नव्या लँग्या व्हायरसचं टेन्शन चीनमधील वुहानमध्ये आढळलेल्या कोविड -19 विषाणूने जगभरात खळबळ माजवली. आता झूनोटिक लँग्या (Zoonotic Langya) या विषाणूचा 35 जणांना संसर्ग झाल्याने चीनमध्ये धास्ती वाढली आहे. ग्लोबल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या शेडोंग आणि हेनान प्रांतातील व्यक्तींमध्ये नव्या प्रकारातील हेनिपा व्हायरस लँग्या या विषाणूचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. हेनिपा व्हायरसला लँग्या हेनिपा व्हायरस म्हणजेच एलएव्ही असंही म्हटलं जातं. पूर्व चीनमध्ये ताप आलेल्या रुग्णांच्या घशातून घेतलेल्या नमुन्यांमध्ये तो आढळला आहे. नव्याने शोध लागलेला हेनिपा व्हायरस प्राण्यांकडून माणसांमध्ये आल्याची शक्यता असल्याचं या संशोधनात सहभागी झालेल्या वैज्ञानिकांनी म्हटलं आहे. याचा संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये ताप, थकवा, खोकला, अस्वस्थतता, उलटीसह इतर काही लक्षणं दिसून येतात. शेडोंग आणि हेनानमध्ये लँग्या हेनिपा व्हायरसचा संसर्ग झालेल्या 35 पैकी 26 प्रकरणांमध्ये ताप, चिडचिडेपणा, खोकला, भूक न लागणं (Anorexia), स्नायूंमध्ये वेदना (Myalgia), डोकेदुखी, उलटी यासारखी लक्षणं असल्याचं समोर आलं. सध्या हेनिपा व्हायरससाठी कुठलीही प्रतिबंधात्मक लस किंवा उपचार नाहीत. योग्य ती काळजी घेणं हा एकमात्र उपचार असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. तज्ज्ञांच्या मते, आता या विषाणूला घाबरण्याची गरज नाही. या विषाणूकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Corona, Corona updates

    पुढील बातम्या