मराठी बातम्या /बातम्या /देश /मशिदीत जियारतीनंतर पहिल्यांदा मदरशात गेले मोहन भागवत; मुलांना विचारलं?

मशिदीत जियारतीनंतर पहिल्यांदा मदरशात गेले मोहन भागवत; मुलांना विचारलं?

पहिल्यांदाच भागवत अचानक मदरशात गेले होते. या मदरशात 300 मुलं शिकतात.

पहिल्यांदाच भागवत अचानक मदरशात गेले होते. या मदरशात 300 मुलं शिकतात.

पहिल्यांदाच भागवत अचानक मदरशात गेले होते. या मदरशात 300 मुलं शिकतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 22 सप्टेंबर : आरएसएस प्रमुख मोहन भागवत गुरुवारी सकाळी दिल्लीच्या केजी मार्गावरील मशिदीत पोहोचले आणि या मुलाखतीदरम्यान भागवतांसोबत गोपाल कृष्ण आणि आरएसएस नेते इंद्रेश कुमारदेखील उपस्थित होते. साधारण 40 मिनिटांपर्यंत भेटीचा कार्यक्रम सुरू होता. दिल्लीतील मशिदीत बैठकीनंतर मोहन भागवत मदरशातदेखील गेले. येथे भागवतांनी आझाद मार्केटमधील मदरशातील मुलांची भेट घेतली.

भागवतांनी पहिल्यांदाच दिली अशी भेट...

पहिल्यांदाच भागवत अशा प्रकारे अचानक मदरशात गेले होते. या मदरशात 300 मुलं शिकतात. मोहन भागवतांनी मशिदीतील बैठकीनंतर केजी मार्ग स्थित मशिदीच्या इमाम उमैर इलियासीचे वडील जमील इलियासीच्या मजारवर जियारत देखील केली. यानंतर मोहन भागवतांनी इमामच्या कुटुंबीयांची भेट घेतली. याबाबत इमाम उमर म्हणाले की, भागवत येथे येणं म्हणजे हा आपण एकत्र असल्याचा संदेश आहे. ते येथे आल्यामुळे एक चांगला मेसेज गेला आहे. भागवतांनी हिंदू-मुस्लीमांच्या डीएनएबद्दल जे म्हटलं ते योग्य आहे. त्यांनी एकमेकांना एकत्र राहण्याबाबत सांगितलं आहे.

कर्नाटक हिजाब प्रकरणः सुप्रीम कोर्टात SG मेहतांचा जोरदार युक्तिवाद, कुराणात फक्त हिजाबचा उल्लेख पण..

मोहन भागवत म्हणाले...

मोहन भागवत मदरशातील मुलांना म्हणाले की, सर्वांनी मिळून मिसळून राहावं. आपला देश विकास करीत आहे. आपण सर्वजण देशाच्या विकासात भागीदार व्हा. देशाला पुढे घेऊन जाणं, हा सर्वांचा प्रयत्न असायला हवं. हाच प्रत्येक भारतीयाचा प्रयत्न असायला हवा.

First published:
top videos

    Tags: Muslim, Rss mohan bhagwat