अमेरिका, चीन या महासत्तांशी आखले डावपेच, या वरिष्ठ अधिकाऱ्याचा मंत्रिमंडळात समावेश

एस. जयशंकर जेव्हा परराष्ट्र सचिव होते तेव्हा त्यांनी अमेरिका आणि चीनसारख्या महासत्तांशी राजनैतिक संबंधांवर पकड मिळवली होती. चीन आणि भारत यांच्या परस्पर संबंधांमध्ये गेल्या काही काळात अनेक चढउतार पाहायला मिळाले. त्यावेळी डोकलाम प्रश्नासारखा अवघड तिढाही जयशंकर यांनी मुत्सद्दीपणे सोडवला.

News18 Lokmat | Updated On: May 30, 2019 08:52 PM IST

अमेरिका, चीन या महासत्तांशी आखले डावपेच, या वरिष्ठ अधिकाऱ्याचा मंत्रिमंडळात समावेश

नवी दिल्ली, 30 मे : नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांना स्थान देण्यात आलं आहे. सुब्रमण्यम जयशंकर यांचा गाढा अनुभव बघता त्यांच्यावर परराष्ट्र खात्यामधली महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाईल, अशी शक्यता आहे.

डोकलामचा तिढा सोडवला

एस. जयशंकर जेव्हा परराष्ट्र सचिव होते तेव्हा त्यांनी अमेरिका आणि चीनसारख्या महासत्तांशी राजनैतिक संबंधांवर पकड मिळवली होती. चीन आणि भारत यांच्या परस्पर संबंधांमध्ये गेल्या काही काळात अनेक चढउतार पाहायला मिळाले. त्यावेळी डोकलाम प्रश्नासारखा अवघड तिढाही जयशंकर यांनी मुत्सद्दीपणे सोडवला. भारताच्या परराष्ट्र धोरणाची दिशा ठरवण्यात त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

एस. जयशंकर हे 64 वर्षांचे आहेत. पराराष्ट्र खात्यातला त्यांचा गाढा अनुभव सरकारसाठी उपयोगी ठरेल. त्यांच्याकडे मंत्रिपदाची धुरा सोपवणं हे त्यांच्या कार्यक्षमतेला दिलेलं प्रशस्तिपत्रच आहे.

प्रभावी परराष्ट्र धोरण

Loading...

अमेरिका आणि चीनसारख्या महासत्तांची ज्याला उत्तम जाण आहे अशी व्यक्ती मंत्रिमंडळात आल्यामुळे मोदी सरकारचं परराष्ट्र धोरण आणखी प्रभावी ठरणार आहे. नरेद्र मोदींच्या कारकिर्दीत भारत आणि जपानच्या संबंधांमध्ये नवं पर्व सुरू झालं. मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यामध्ये मैत्रीचं नातं विकसित होण्यातही जयशंकर यांचं योगदान मोठं आहे.

नरेंद्र मोदींवर प्रभाव

2015 ते 2018 या काळात एस. जयशंकर परराष्ट्र सचिव होते. त्यावेळी जयशंकर यांची बुद्धिमत्ता, अनुभव, त्यांची कार्यशैली यामुळे पंतप्रधान नरेद्र मोदी प्रभावित झाले. 2018 मध्ये ते निवृत्त झाले त्यावेळीही भारत सरकार वेळोवेळी त्यांचा सल्ला घेत असे.

निवृत्त झाल्यानंतर एस. जयशंकर हे टाटा अँड सन्समध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळत होते.आता त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे.

==================================================================================

शरद पवार काँग्रेसचे नवे अध्यक्ष? राहुल गांधींसोबतच्या भेटीचा EXCLUSIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2019 08:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...