जाहिरात
मराठी बातम्या / देश / Meri Mati Mera Desh campaign: शहिदांच्या स्मरणार्थ मोदी सरकार राबवणार नव अभियान; वाचा संपूर्ण प्लान

Meri Mati Mera Desh campaign: शहिदांच्या स्मरणार्थ मोदी सरकार राबवणार नव अभियान; वाचा संपूर्ण प्लान

मोदी सरकार राबवणार नव अभियान

मोदी सरकार राबवणार नव अभियान

Meri Mati Mera Desh campaign: देशभरात 09 ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान राबविण्यात येणार आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 28 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हाही संधी मिळेल तेव्हा शहीदांचा सन्मान करायला विसरत नाहीत. आता देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना मोदी सरकार शहीद आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान सुरू करणार आहे. या कार्यक्रमांतर्गत देशभरात खेड्यापासून शहरांपर्यंत कार्यक्रम राबवले जाणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये लाखो अनामिक स्वातंत्र्यसैनिक, शहीद आणि वीरांच्या नावाचे फलक लावले जातील आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान केला जाईल. ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान कसं आहे? ‘मेरी माटी मेरा देश’ कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ग्रामीण विकास मंत्रालयाचे सचिव शैलेश कुमार सिंह आणि युवा कार्य विभागाच्या सचिव मीता राजीवलोचन यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली अलीकडेच बैठक झाली. या बैठकीत सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. युवा कार्य सचिव यांनी कार्यक्रमाच्या स्वरूपाबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे आयोजन 09 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत करण्यात येणार असून देशभरातील सुमारे 7,500 ब्लॉकमधून निवडलेले तरुण दिल्लीच्या कर्तव्यपथावर या कार्यक्रमासाठी एकत्र येतील. ते त्यांच्या राज्यातील सर्व गावे/ग्रामपंचायतींमधून माती आणतील. ‘वसुधा वंदन’ कार्यक्रमाची दिल्लीतील कर्तव्य मार्गावर उभारण्यात येणाऱ्या अमृत वाटिकेत देशी वनस्पती आणि शिलाफलकम असणार आहेत. वाचा - राष्ट्रपतींनाही मराठमोळ्या जेवणाची भूरळ; ‘त्या’ दोन आचाऱ्यांना बोलावलं थेट राष्ट्रपती भवनात ग्रामविकास सचिव शैलेश कुमार सिंह यांनी ‘वसुधा वंदन’ आणि ‘शिलाफलकम’चे महत्त्व सांगत, प्रत्येक ग्रामपंचायत/गाव वसुधा वंदन अंतर्गत देशी प्रजातींची 75 रोपे लावून पृथ्वीमातेचे संवर्धन करतील. तसेच ‘वसुधा वंदन’ कार्यक्रम अमृत सरोवर किंवा कोणत्याही जलकुंभावर किंवा शाळा, ग्रामपंचायत इमारती किंवा ग्रामपंचायतीने ठरविल्यानुसार योग्य ठिकाणी/सार्वजनिक ठिकाणी आयोजित केला जाऊ शकेल. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सर्व वीरांप्रति आपल्या मनातील भावना व्यक्त करणे हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे. ग्रामीण विकास सचिवांनी सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना लोकसहभाग सुनिश्चित करण्याचे आवाहन केले असून सर्व स्तरातील लोकांना कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात