लिसिप्रिया गेली 2 वर्षे एक मोहीम चालवते आहे. पर्यावरणाबाबत जागरूकता वाढवणं आणि वातावरणबदलाबाबत साक्षरता वाढवण्यासाठी शाळेतील अभ्यासक्रमामध्ये त्याचा समावेश करणं यासाठी ही मोहीम आहे. भाषणातही तिनं मुद्दे मांडले, की आता अतिशय आणीबाणीची वेळ आहे. आपण वातावरणबदलाबाबत आता जागे झालो नाही तर मोठ्या संकटात अडकू. तिनं हा प्रश्नसुद्धा विचारला, की वातावरणबदलाची समस्या तर तिच्या जन्मापूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. मग तज्ज्ञांनी आजवर या समस्येकडे लक्ष देत तिला का सोडवलं नाही? तिनं आज या परिषदेत येण्याऐवजी खेळण्यात किंवा शाळेत जाण्यात तिचा वेळ घालवायला पाहिजे होता, असंही ती स्पष्टपणे म्हणाली. याशिवाय लिसिप्रिया हातात फलक घेऊन अनेक आठवडे देशातील संसदेबाहेरसुद्धा (parliament) हातात फलक घेऊन उभी राहिली. देशात वातावरणबदलाचे कायदे केले जावेत आणि कार्बन उत्सर्जनाचं नियमन केलं जावं हे तिला अपेक्षित होतं. मात्र तिच्या हाती निराशा आली. शासन मतं आणि आर्थिक बाबींमध्येच जास्त रस घेत असल्याचं निरीक्षण तिनं नोंदवलं. तिला मोठं होऊन अवकाशतज्ञ बनायचं आहे. युनायटेड नेशन्सच्या परिषदेत सहभाग घेण्यासाठी जाताना तिनं शासनाकडं सतत निधीची मागणी केली. मात्र तिनं सतत विनंती करूनही शासनानं प्रतिसाद दिला नाही.It will be soon become a global movement.
Everything starts with “Education”. I strongly believe ur school children can lead the change. Include Climate Education compulsory in the school education curriculum to fight climate change from the grassroots.https://t.co/eMW14RwHhe — Licypriya Kangujam (@LicypriyaK) January 22, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Environment, Greta Thunberg, Mission paani