मराठी बातम्या /बातम्या /देश /Mission Paani Waterthon : हायड्रोथेरपीमुळे वाचला होता अक्षय कुमारचा जीव; शेअर केला किस्सा

Mission Paani Waterthon : हायड्रोथेरपीमुळे वाचला होता अक्षय कुमारचा जीव; शेअर केला किस्सा

पाणीटंचाई ही मानवी भविष्यातील एक तीव्र समस्या बनू शकते. त्यापासून वाचण्यासाठी 'मिशन पाणी वॉटरथॉन' हा एक महत्त्वाचा प्रकल्प न्यूज 18 ने सुरू केला आहे.

पाणीटंचाई ही मानवी भविष्यातील एक तीव्र समस्या बनू शकते. त्यापासून वाचण्यासाठी 'मिशन पाणी वॉटरथॉन' हा एक महत्त्वाचा प्रकल्प न्यूज 18 ने सुरू केला आहे.

पाणीटंचाई ही मानवी भविष्यातील एक तीव्र समस्या बनू शकते. त्यापासून वाचण्यासाठी 'मिशन पाणी वॉटरथॉन' हा एक महत्त्वाचा प्रकल्प न्यूज 18 ने सुरू केला आहे.

नवी दिल्ली, 26 जानेवारी : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनं (Bollywood actor Akshay Kumar) न्यूज-18 च्या मिशन पानी या खास कार्यक्रमात आपलं मनोगत व्यक्त केलं. पाण्याचं महत्त्व सांगतांना त्यानं अनेक वैयक्तिक अनुभव शेअर केले. पाण्यामुळं आपला जीव कसा वाचला हेसुद्धा त्यानं शेअर केलं.

न्यूज-18 सध्या इंडिया हार्पिकसोबत (Harpic India) एकत्र येत मिशन पानी (Mission Paani) नावाचं एक कॅम्पेन (campaign) मंगळवारपासून चालवतो आहे. लोकांना पाणी वाचवण्यासाठी (Save water) प्रोत्साहित करणं हा या उपक्रमाचा हेतू आहे. अक्षय कुमार या मोहिमेचा सदिच्छादूत (ambassador) आहे. 'पानी की कहानी, भारत की जुबानी' ही या कॅम्पेनची थीम आहे. या कार्यक्रमात लोक देशभरात होत असलेल्या पाणीटंचाईची (water scarcity) चर्चा करत आहेत.

अक्षय कुमार या मोहिमेअंतर्गत बोलताना म्हणाला, की स्लिप डिस्कमुळं (slip disc) माझ्या तब्येतीच्या अडचणी खूप वाढल्या होत्या. मात्र हायड्रोथेरेपीद्वारे उपचार घेऊन मी बरा झालो. हायड्रोथेरेपी ही पाण्याच्या माध्यमातून केली जाणारी एक थेरपी आहे. याचा उपयोग साधारणतः दुखापतीतून बाहेर येण्यासाठी केला जातो. अक्षय कुमारनं सांगितलं, की 1990 साली स्लिप डिस्कमुळं तो कमालीचा त्रस्त होता. मात्र हायड्रोथेरपीमधून (hydrotherapy) तो पूर्णतः चांगला झाला.

अक्षयनं सांगितलं, की या त्रासातून बाहेर येण्यासाठी त्यानं बरेच प्रयत्न केले. मात्र शेवटी एका डॉक्टरांच्या सांगण्यावरून त्यानं हायड्रोथेरेपी घेतली. या थेरपीबाबत सांगतांना अक्षय म्हणाला, 'ही थेरपी तुम्हाला पाण्यात राहत काम करायला लावते. चालणं, पोहणं, कुठलाही व्यायाम, यादरम्यान व्यक्तीला पाण्यातच राहायचं असतं. यातून शरीराला ताणातून आणि त्रासातून मुक्ती मिळते.

First published:

Tags: Akshay Kumar, Mission paani, नेटवर्क 18