नवी दिल्ली, 27 जानेवारी : कौटुंबिक नातेसंबंधांना प्रत्येकाच्या मनात अतिशय जिव्हाळ्याचं स्थान असतं. मात्र अनेकदा या स्थानाला धक्का देणाऱ्या घटना आपल्या अवतीभवती घडतात. उत्तर प्रदेशात अशीच एक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) बारापंकी इथं एका तरुणीची तिच्या आईसोबत वडील आणि भावानं मिळून क्रूर हत्या केली आहे. पोलिसांनी आई मीना कुमारी, वडील मंशाराम आणि भाऊ हरिओम यांना ताब्यात घेतलं आहे. विशेष दुर्दैवी बाब काय, तर जिचा जीव घेतला गेला ती तरुणी मानसिकदृष्ट्या अस्थिर (mentally imbalance) होती. तेच तिच्या मृत्यूचं कारण ठरलं. ही कुटुंबातील सदस्य मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्यानं कुटुंबाला (family) समाजात लाज वाटत होती म्हणून तिची हत्या (murder) करण्याचं टोकाचं पाऊल उचललं गेल्याचं वास्तव समोर आलं आहे. मुलीचा भाऊ गेल्या तीन महिन्यापासून हत्येची योजना करत होता. त्यावेळी आई-वडील यासाठी तयार नव्हते. मात्र मुलानं सतत त्यांच्या मागे लागत त्यांना राजी केलं. तेसुद्धा तयार झाले तशी ही योजना अमलात आणली गेली. मुलानं वडिलांना घराबाहेर उभं राहत पहारा द्यायला सांगितला. त्यानंतर मुलीचे हातपाय बांधून ठेवले. भावानं गळा दाबून तिला ठार केलं. अनुसूचित जाती-जमातीच्या तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या केली गेल्यास कुटुंबियांना आर्थिक मदत मिळते. मदतीचा हव्यास बाळगत कुटुंबानं या तरुणीच्या हत्येचाही थंड डोक्यानं बनाव रचला. तिच्या गुप्तांगावर जखमा करत त्यांनी तिला घराजवळच्या शेतात फेकलं. पोलिसांना तिथं तिचा मृतदेह (dead body) नग्न (nude) अवस्थेत सापडला. वडिलांनी अत्याचार करून मुलीचा खून झाल्याची तक्रारही दाखल केली. मात्र घटनास्थळी सापडलेली चप्पल पीडित मुलीची नसल्याचं पोलिसांना लक्षात आलं. शिवाय पोस्टमार्टम रिपोर्टमध्येही (postmortem report)तिच्यावर कुठले अत्याचार झाले नसल्याचं समोर आलं. पोलिसांनी सखोल तपास केल्यावर हे धक्कादायक वास्तव समोर आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.