'मासिक पाळीच्या काळात स्वयंपाक केला तर पुढचा जन्म कुत्रीचा', स्वामींची मुक्ताफळं

'मासिक पाळीच्या काळात स्वयंपाक केला तर पुढचा जन्म कुत्रीचा', स्वामींची मुक्ताफळं

मी जर बोललो नाही तर लोकांना कसं समजेल. तुम्हाला जसं ठीक वाटेल ते करा पण शास्त्रात हेच लिहिलं असल्याचं स्वामी कृष्णस्वरुप यांनी म्हटलं आहे.

  • Share this:

राजकोट, 18 फेब्रुवारी : काही दिवसांपूर्वी गुजरातमधील शाळेत मुलींना मासिक पाळी आली की नाही हे चेक करण्यासाठी कपडे उतरवल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. त्यानंतर गुजरातच्या भुज इथल्या स्वामीनारायण मंदिराच्या स्वामी कृष्णस्वरुप दासजी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता स्वामी वादात अडकले आहेत. कृष्णस्वरुप दासजी म्हणाले की, मासिक पाळीच्या काळात अन्न शिजवण्यावरून त्यांनी मत व्यक्तं केलं होतं. ते म्हणाले होते की, एखादी महिलेनं मासिक पाळीच्या काळात स्वयंपाक तर ती पुढच्या जन्मी कुत्री होईल. तसंच अशा महिलांच्या हातचे अन्न खाणारी व्यक्ती पुढच्या जन्मात बैल होईल.

स्वामी कृष्णस्वरुप दासजी स्वामीनारायण हे भुज मंदिरात उपदेशक आहेत. त्यांनी एका उपदेशात सांगितलं की, मासिक पाळीच्या काळात महिलेनं अन्न शिजवलं आणि ते एखाद्याने खाल्लं तर त्याचा पुढचा जन्म बैल म्हणून होईल. अहमदाबाद मिररने याबाबतचे वृत्त दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, पुरुषांनी असं अन्न खाल्लं तर त्यासाठी ते स्वत: दोषी असतील.

शास्त्राचा उल्लेख करत स्वामींनी सांगितलं की, या गोष्टींबाबत स्पष्टपणे लिहिलं आहे. लग्नाआधी तुम्हाला माहिती असायला हवं की जेवण कसं खायचं आहे असंही स्वामी कृष्णस्वरुप दासजी म्हणाले.

स्वामी म्हणाले की, मला माहिती नाही की मी आधी हे तुम्हाला सांगितलं आहे की नाही. पण गेल्या दहा वर्षांत मी पहिल्यांदा हा सल्ला देत आहे. अनेक संत मला सांगत असतात की आपल्या धर्मातील काही तथ्यांवर बोललं नाही पाहिजे.पण मी जर बोललो नाही तर लोकांना कसं समजेल. तुम्हाला जसं ठीक वाटेल ते करा. मात्र शास्त्रात हेच लिहिलं आहे.

स्वामी कृष्णस्वरुप यांच्या उपदेशाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर स्वामीनारायण भुज मंदिरच्या विश्वस्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र यावर बोलण्यासा नकार देण्यात आला. तसेच या वक्तव्याबाबत कोणती माहिती नसल्याचंही म्हटलं.

वाचा : प्रेमीचा विकृतपणा...महिलेने घटस्फोट घ्यावा म्हणून अपहरण करुन केले घृणास्पद कृत्य

याआधी भुजमध्ये एका महिला महाविद्यालयात मासिक पाळीवरून विद्यार्थीनींशी गैरवर्तन केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. मासिक पाळीच्या काळात विद्यार्थिनींनी इतर विद्यार्थीनींशी बोलू नये तसंच त्यांच्याशी संपर्क करू नये असंही म्हटलं होतं. यानंतर आता कृष्णस्वरुप दासजी यांच्या व्हिडिओने खळबळ उडाली आहे.

वाचा : लग्नाच्या पहिल्या रात्री घडलं अघटित...’त्या’ पत्नीविरोधात पोलिसात केली तक्रार

First published: February 18, 2020, 5:16 PM IST
Tags: Gujrat

ताज्या बातम्या