मराठी बातम्या /बातम्या /देश /

भारतात वैद्यकीय पर्यटनाचा वेग वाढला: हील इन इंडिया उपक्रमाने आरोग्य क्षेत्रातील जागतिक नेता म्हणून भारताचे स्थान उंचावले

भारतात वैद्यकीय पर्यटनाचा वेग वाढला: हील इन इंडिया उपक्रमाने आरोग्य क्षेत्रातील जागतिक नेता म्हणून भारताचे स्थान उंचावले

भारतातील वैद्यकीय पर्यटनची वेगाने वाढ

भारतातील वैद्यकीय पर्यटनची वेगाने वाढ

भारतातील वैद्यकीय पर्यटन (मेडिकल टुरिझम) ची वेगाने होत असलेली वाढ: हील इन इंडिया उपक्रमामुळे भारताची आरोग्यक्षेत्रामधील गणना जगातील आघाडीच्या देशांमध्ये होऊ लागली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

‘हील इन इंडिया’ उपक्रमाच्या माध्यमातून भारत वैद्यकीय कारणांसाठी पर्यटन केले जाण्याचे विश्व कशारीतीने घडवतो आहे ते पाहा

भारतातील वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीची कल्पना घ्यायची असल्यास त्याबद्दल कोणत्याही वयोवृद्धाला विचारावे आणि त्यांचे चेहरे कशारीतीने खुलतात ते तुम्हाला दिसून येईल. फार जुनी गोष्ट नाही जेव्हा भारतीय क्लिष्ट शस्त्रक्रिया किंवा प्रायोगिक तत्त्वावर केले जाणारे उपचार लागणार्‍या रोगांसाठी किंवा शारिरीक परिस्थितींसाठी पाश्चिमात्य देशांत जात असत.

मात्र आता जगभरातील लोक उपचारांसाठी भारतात येत आहेत. भारतीय आरोग्य उद्योगक्षेत्र जगभरात उच्च गुणवत्तापूर्ण आणि खिशाला परवडण्याजोगे ठिकाण म्हणून आपले स्थान मजबूत करत आहे तेही अशा काळात जेथे पाश्चिमात्य जगामध्ये गुणवत्तापूर्ण वैद्यकीय क्षेत्राकडे लक्ष देणे अवघड होत चालले आहे.

भारतामधील आरोग्यसेवा क्षेत्रामध्ये हॉस्पिटल्स, वैद्यकीय उपकरणे, क्लिनिकल चाचण्या, आऊटसोर्सिंग, टेलिमेडिसिन, वैद्यकीय पर्यटन, आरोग्यविमा आणि वैद्यकीय उपकरणांचा समावेश होतो. जीवनशैलीमुळे उद्भवणारे रोग, खिशाला परवडणार्‍या आरोग्यक्षेत्र प्रणाल्या, तांत्रिक प्रगती, टेलिमेडिसिनची महत्त्वाची गरज, आरोग्य विमाक्षेत्राचा वेगाने वाढणारा व्याप आणि ई-हेल्थ (कर सवलती आणि लाभांसह) सारख्या सरकारी उपक्रमांचे वाढते स्वरूप हे भारतामध्ये आरोग्यक्षेत्राची बाजारपेठ वाढवते आहे.

भारतातील आरोग्यसेवा क्षेत्राबद्दलचा दृष्टीकोन

202 मध्ये, Indian Healthtech industry was valued at $1.9bn. 2023 पर्यंत ते $5 बिलियनपर्यंत वाढणे अपेक्षित आहे. हाच प्रकार आम्हाला रोगनिदान क्षेत्रातील बाजारपेठेतही दिसून येत आहे जे 20.4% च्या CAGR of 20.4% to reach $32 bn in 2022, जे 2012 मध्ये $5 बिलियन इतकेच होते. टेलिमेडिसिन क्षेत्र $5.4 Bn by 2025 आकडा गाठेल असे अपेक्षित आहे आणि डिजीटल हेल्थच्या ब्लुप्रिंटने ही $200bn in the next 10 years अतिरिक्त मूल्याचे दालन उघडणे अपेक्षित आहे.

केवळ हेच आकडे डोळे विस्फारणारे वाटत असल्यास 2022 पर्यंत भारतातील संपूर्ण आरोग्यसेवेचे क्षेत्र हे projected to reach $372 bn by 2022. भारत जगाची फार्मसी आधीच आहे. तसेच आता सरकारच्या 2022-23 युनियन बजेटमधून Rs.86,200 crores for the Ministry of Health and Family Welfare निधीने भारतातील आरोग्यसेवा क्षेत्रातील मेडिकल व्हॅल्यु ट्रॅव्हल (MVT) साठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

आत्ताच्या घडीला, 2020-21 साठी वैद्यकीय पर्यटन आकडेवारीत (MTI) India is ranked 10th. जे अशाप्रकारच्या पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाचे एकत्रित फळ आहे. भारतामध्ये डॉक्टर आणि निम्न-वैद्यकीय सेवांतील मनुष्यबळाचे उच्च गुणवत्तेचे प्रशिक्षण प्राप्त केलेले आणि इंग्रजी अस्खलित बोलता येणार्‍यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. जगातील सर्वाधिक वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या भारतात आहे आणि 1mn skilled healthcare providers by 2022 येथे उपलब्ध होईल असे अपेक्षित आहे. आणि आता National Accreditation Board for Hospitals & Healthcare Providers  (NABH), अंतर्गत 1400 hospitals पेक्षा अधिक मध्ये अप्रतिम अथवा जागतिक मानकांच्या वर शुषृषा प्रदान केली जाते.

भारत सरकारने भारताला वैद्यकीय आणि निरोगी आरोग्यासाठीच्या पर्यटनासाठी जगातील आघाडीचे केंद्र बनवण्याच्या दृष्टीने घडवण्यासाठी कटिबद्ध आहे ज्यामध्ये Heal in India अंतर्गत जगभरातील पर्यटकांना आमंत्रित केले जाऊन ‘अतिथी देवो भव’ च्या साथीने ‘सेवे’ च्या संदेशाची देखील जुळणी करण्यात आली आहे. या उपक्रमांपैकी MVT पोर्टल हे एक पाऊल आहे जे भारतामध्ये वैद्यकीय उद्देशाने येणार्‍या पर्यटकांना एक अविस्मरणीय अनुभव देणे हा असून ज्यामध्ये त्यांच्या प्रवासाचा आरंभबिंदूपासून अंतिम बिंदूपर्यंत सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. रूग्ण आणि देखभालकर्त्यांना पद्धती, शहरे, हॉस्पिटल्स आणि विशिष्ट डॉक्टरांना देखील यामध्ये शोधता येते. त्यांना ऑनलाइनच पारदर्शक किंमतींचे पॅकेज अ‍ॅक्सेस करता येत आहे जे केवळ अ‍ॅलोपॅथी आणि अंतर्भूत औषधांपुरते नसून पारंपारिक भारतीय औषध प्रणाली देखील यामध्ये उपलब्ध आहे. त्यांना NABHसोबत जोडले गेलेल्या MVT सेवाप्रदात्यांमार्फत त्यांच्या प्रवासाशी संबंधित व्यवस्था देखील करता येते आहे.

परदेशी नागरिक भारतामध्ये तीन प्रकारे मेडिकल व्हॅल्यु ट्रॅव्हलसाठी येऊ शकतात:

वैद्यकीय उपचार:  शस्त्रक्रिया, अवयव प्रत्यारोपण, सांधे प्रत्यारोपण, कर्करोग आणि दीर्घकाळ असलेल्या रोगांवरील उपचार इ. उपचारांच्या उद्देशाने

निरोगी आयुष्य आणि कायाकल्पासाठी: कायाकल्पाची शस्त्रक्रिया (कॉस्मेटिक सर्जरी), ताणापासून मुक्ती, स्पा इ. सौंदर्याच्या कारणांसाठी असलेल्या सेवांचा उपभोग घेण्यासाठी.

पारंपारिक औषधे: भारतातील पारंपारिक औषध प्रणालीचा आयुष (आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी) मंत्रालयांतर्गत समावेश केला जातो.

भारतामध्ये मेडिकल व्हॅल्यु ट्रॅव्हलला कशी चालना मिळते?

सगळ्यात मूलभूत म्हणजे पैशांची बचत प्रचंड होते. भारतामध्ये जागतिक दर्जाची शुषृषा आणि कमी खर्चिक उपचार दिले जातात ज्यामुळे ~65-90% as compared to the US बचत होते. उच्च दर्जा आणि कमी खर्च ही जुळणी पाश्चिमात्य नागरिकांसाठी ज्यांना आपल्या मायदेशात दीर्घकाळ थांबावे लागत असेल किंवा त्याच उपचारांसाठी प्रतिबंधित खर्च करावे लागत असतील अशांसाठी आकर्षक ठिकाण ठरू शकते.

भारतीय हॉस्पिटल्सनी रोबोटिक शस्त्रक्रिया, रेडिएशन, सायबरनाईफ स्टिरीओस्टॅटिक ऑप्शन्स, IMRT/IGRT, ट्रांसपोर्ट सपोर्ट सिस्टम्स इ. सारख्या अत्यंत प्रगत तंत्रज्ञानांमध्ये गुंतवणूक केली आहे. भारतामध्ये अत्यंत प्रसिद्ध सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल्स आणि वैद्यकीय सेवा आहेत ज्या रूग्णांना आर्टिफिश्यल इंटेलिजन्स (AI), व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी (VR) आणि होलिस्टिक औषध यांसारख्या नवीनतम तंत्रज्ञांच्या साहाय्याने वैद्यकीय सेवा प्रदान करतात.

वैद्यकीय उपचारांसाठी भारत लोकप्रिय ठिकाण असण्याचे आणखी एक कारण म्हणजे उपलब्ध उपचारांचे वैविध्य. भारताचा मानबिंदू म्हणजे आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्धा आणि होमिओपथी, हे आता Ministry of AYUSH च्या अखत्यारित आणण्यात आले आहे आणि यातून रूग्णांना सातत्त्यपूर्ण अनुभव देण्याच्या दृष्टीने नियामित केलेले आहे. योगाश्रम, स्पा आणि वेलनेस केंद्रे जी होलिस्टिक उपचार देतात हे निरोगी आयुष्याचा दृष्टीकोन असणार्‍या वैद्यकीय पर्यटकांना देखील आकर्षित करतात.

सर्वात महत्त्वाचा असा घटक जो रूग्ण आणि त्यांचे देखभालकर्ते यांना भारतात आणतो तो म्हणजे गुणवत्तेची हमी. वैद्यकीय पर्यटनाला पुढे नेणारे आणि त्यामध्ये सुधारणा करणारी संस्थात्मक बांधणी देण्यासाठी भारताच्या पर्यटन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय वैद्यकीय आणि निरोगी आयुष्य पर्यटन विभागाची स्थापना करण्यात आली आहे ज्यामध्ये भारतीय प्रणालीचा देखील समावेश आहे.  हे मंडळ वैद्यकीय पर्यटनावर प्रशासन ठेवते आणि त्याला अधिकाधिक चालना देण्याचे कार्य करणारी ही प्रमुख संस्था आहे ज्याचे प्रतिनिधित्व आयुष (AYUSH) मंत्रालय आणि NABH करतात.

भारताची गुणवत्तेची चळवळ

भारताने गुणवत्तायुक्त कारवायांची गरज जाणून घेतली, विशेष करून रूग्णाच्या सुरक्षेबद्दल हा संदर्भ अधिक जवळचा ठरला. भारतीय गुणवत्ता समिती (QCI) ने भारतामध्ये गेल्या 25 वर्षात गुणवत्तेची चळवळ उभारण्यात प्रमुख भूमिका बजावली असून त्यासाठी आपला मालाच्या गुणवत्तेबाबत हमी देणे आणि विविध क्षेत्रात्रील उत्पादनांना प्रमाणीकृत केलेले आहे. याचाच परिणाम म्हणून भारताच्या संसदेमध्ये जेव्हा याबद्दल प्रश्न उभा राहिला तेव्हा एप्रिल 2005 मध्ये क्युसीआयच्या अखत्याररीदाखल NABH ची स्थापना करण्यात आली.

NABH ने आपला प्रवास आरोग्यसेवा क्षेत्रामधील गुणवत्तेच्या आणि सुरक्षेच्या जागतिक स्तराच्या मानकांची काळजी घेण्याच्या दृष्टीने सुरू केला होता. NABHने भारमध्ये 2006 पासून आरोग्यसेवा प्रदाता संस्थांना मानांकन देण्यास सुरूवात केली आणि 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय मानांकनामध्ये देखील आपला विस्तार वाढवला. ते नर्सिंग उत्कृष्ठता कार्यक्रम, लॅबोरेटरीज प्रमाणपत्र कार्यक्रम आणि इतर बरेच कार्यक्रम यांसारखे गुणवत्त्तेला बढावा देणारे उपक्रम राबवतात. यांच्याकडून शिक्षण आणि प्रशिक्षण उपक्रम त्याचप्रमाणे विविध आरोग्य सेवांच्या गुणवत्तेबाबतचे प्रशिक्षण वर्ग आणि शिबीरे राबवतात.

NABH प्रमाणपत्रांमध्ये संपूर्ण आरोग्यसेवा क्षेत्राचे सार असते: हॉस्पिटल्स, लहान आरोग्यसेवा प्रदान करणार्‍या संस्था, रक्तपेढ्या आणि रक्तसंग्रहण केंद्रे, मेडिकल इमेजिंग सेवा, दंत आरोग्यसेवा प्रदाते, अ‍ॅलोपेथिक क्लिनिक्स, आयुष हॉस्पिटल्स आणि पंचकर्म क्लिनिक्स, डोळ्यांची देखभाल करणार्‍या संस्था, ओरल सब्स्टिट्युशन केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वेलनेस केंद्रे, व्यसनाधीन लोकांसाठी पुनर्वसन केंद्रे तसेच क्लिनिकल चाचण्यांच्या नीतीमत्ता समित्या

या प्रमाणपत्रांना विविध प्रमाणपत्रांचे, शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचे समर्थन असते जे मानांकन मिळवण्यासाठी वैद्यकीय सेवा प्रदात्यांना आवश्यक असू शकेल. काटेकोर पालन केले जातील अशी मानके प्रस्थापित करण्यासाठी, विविध संसाधने प्रदान करणे आणि या प्रदात्यांसाठी तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध राहावे यासाठी एनएबीएच एक असे वातावरण निर्माण करते जे गुणवत्ता, पारदर्शकता आणि विश्वासार्हतेला भारताच्या एकूण शुषृषा आधारित अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थाठी ठेवते.

भारतातील गुणत्तेची चळवळ ही QCIने आणि NABHसारख्या त्यांच्या समावेशक मंडळांनी सक्षम केली आहे जी भारतातील वैद्यकीय सेवेतील संस्थांच्या वातावरणाला जेव्हढे शक्य असेल त्याहून कित्येक पटीने अधिक कार्य करते. या “गुणवत्ता से आत्मनिर्भरता” दृष्टीकोनातून आपल्याला आपल्या मर्यादांना छेद देऊन पुढे जाण्यात मदत केली आहे. आता भारतीयांना उपचारांसाठी परदेशात जाऊन महागड्या उपचारांमध्ये खर्च करण्याचे दिवस गेले आहेत. त्याऐवजी भारत आता गुणवत्तापूर्ण भारतीय संस्था, सेवाप्रदाते आणि वैयक्तिकरीत्या डॉक्टरांचा शोध घेणार्‍या हजारो रूग्ण आणि त्यांच्या देखभालकर्त्यांना आपलेसे करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो आहे ज्यामुळे त्यांना एका निरोगी भविष्याकडे वाटचाल करता येत आहे.

QCI आणि भारताच्या गुणवत्ता से आत्मनिर्भरता उपक्रम तसेच यातून आपल्या अयुष्यातील विविध पैलूंवर कशारीतीने परिणाम झाला आहे याबाबत जाणून घेण्यासाठी [URL] ला भेट द्या.

First published:

Tags: Medical