लखनऊ, 2 ऑक्टोबर : समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह मुलायम सिंह गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांच्यावर काही दिवसांपासून मेदांता रुग्णालयातच उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. मेदांता हॉस्पिटलने मुलायम सिंह यादव यांच्यांसदर्भातील हेल्थ बुलेटिन प्रसिद्ध केले आहे. हेल्थ बुलेटिनमध्ये काय - मुलायम सिंह यादव यांची प्रकृती आज गंभीर आहे आणि जीवनरक्षक औषधांच्या माध्यमातून त्यांच्यावर मेदांता हॉस्पिटल, गुडगावच्या आयसीयूमध्ये तज्ज्ञांच्या सर्वसमावेशक टीमद्वारे उपचार केले जात आहेत, असे निवेदन मेदांता हॉस्पिटलच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.
मेदांता अस्पताल ने जारी किया आदरणीय नेताजी का हेल्थ बुलेटिन:
— Samajwadi Party (@samajwadiparty) October 9, 2022
Shri Mulayam Singh Yadav ji is quite critical today and on life saving drugs, he is being treated in the ICU of Medanta Hospital, Gurgaon by a comprehensive team of specialists.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलायम सिंह गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांचे कुटुंबिय त्यांना तीन महिन्यांपूर्वीच मेदांता रुग्णालयात घेवून आले होते. मेदांता रुग्णालयात पूर्ण चेकअप केल्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती 2 ऑक्टोबरला सकाळपर्यंत ठीक होती. हेही वाचा - Shivsena VS Shinde : शिवसेनेसमोर या 3 चिन्हाचे पर्याय, उद्याच निवडणूक आयोगाकडे करणार दावा? मात्र, त्याचदिवशी दुपारी अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तातडीने मेदांता रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलायम सिंह यांचं ब्लड प्रेशर आणि ऑक्सिजन लेव्हल आधीपासूनच कमी झालं होतं.