अशोक यादव, प्रतिनिधी कुरुक्षेत्र, 22 जुलै : हरियाणा राज्यातील परगट सिंह नावाच्या व्यक्तीने मागील 22 वर्षात 15 हजारहून अधिक लोकांचे मृतदेह तसेच जीवंत लोकांना कालव्यातून बाहेर काढले आहे. यामध्ये त्यांनी 3 हजार लोकांना पाण्यातून जिवंत बाहेर काढत त्यांचे प्राण वाचवले आहे. आपल्या प्राणांची पर्वा न करता परगट सिंह गेल्या अनेक वर्षांपासून हे काम करत आहेत. 2005 मध्ये परगट सिंह यांच्या आजोबांचा कालव्यात डुबून मृत्यू झाला होता. यानंतर अथक प्रयत्नांनी त्यांचा मृतदेह सापडला होता. यानंतर परगट सिंह यांच्या मनात आले की, कालव्यात डुबलेल्या लोकांच्या वारसांना मदत करण्याचा विचार त्यांनी केला. तेव्हापासूनच ते सिरसा शाखा कालव्यात डुबलेल्या लोकांचे मृतदेह काढण्याचे काम करत आहेत.
परगट सिंह यांनी सांगितले की, शहरातील कोणताही नागरिक संकटाच्या वेळी त्यांना 9729334991 या नंबरवर फोन करू शकतो. यानंतर काहीच वेळात ते कालव्यात शोध मोहिम सुरू करतात. परगट सिंह हे आपला जीव मुठीत घेऊन पंबाज, हरियाणा, राजस्थान, दिल्ली सहित अनेक नद्यांमध्ये उडी घेऊन लोकांचा जीव वाचवतात.
आतापर्यंत किती लोकांना बाहेर काढलं न्यूज18 सोबत बोलताना परगट सिंह यांनी सांगितले की, आतापर्यंत त्यांनी 12 हजारपेक्षा जास्त लोकांना कालव्यातून बाहेर काढलंय. यामध्ये अशी अनेक प्रकरणे आहे, जी पोलिसांसाठीही गंभीर होती आणि पोलीस कालव्यात जायला संकोच करत होती. अशावेळी परगट सिंह यांनी एकाच त्या त्या लोकांचे मृतदेह कालव्यातून बाहेर काढले. इतकेच नव्हे तर त्यांनी मगर या प्राण्यालाही पकडून वनविभागाकडे सूपूर्त केले आहे. त्यांना आतापर्यंत 16 मगरी पकडल्या आहेत. परगट सिंह सांगतात की, कोरोना काळातही त्यांनी हे काम सुरुच ठेवले. अनेक मृतदेह त्यांना कालव्यातून काढून प्रशासनाच्या हाती सोपवले. विशेष म्हणजे ते या कामासाठी कुणाकडूनच एकही रुपया घेत नाहीत. परगट सिंह हे आपल्या कामावर समाधानी आहेत. त्यांना विविध राज्यांमधून तब्बल 400 पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले आहेत. मात्र, सरकार, प्रशासनाच्या कारभारामुळे ते दु:खी आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील अनेक मंत्री यांनी त्यांना सन्मानित केलंय. मात्र, आतापर्यंत कुणीही त्यांच्या नोकरीचा विचार केला नाही.