जाहिरात
मराठी बातम्या / देश / बागेश्वर धाम बाबाविरोधात एकाची पोलीस ठाण्यात धाव; म्हणाला, मला माझे पैसे परत हवेत

बागेश्वर धाम बाबाविरोधात एकाची पोलीस ठाण्यात धाव; म्हणाला, मला माझे पैसे परत हवेत

file photo

file photo

बागेश्वर धाम बाबा पुन्हा वादात सापडण्याची चिन्हे आहेत.

  • -MIN READ Local18 Delhi
  • Last Updated :

जनक दवे, प्रतिनिधी नवी दिल्‍ली, 3 जून : गुजरातमधील राजकोट येथील बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्या दोन दिवसीय दिव्य दरबाराला गुरुवारी सुरुवात झाली. यावेळी हजारो भाविकांनी सहभाग घेतला. पण बाबा बागेश्वर या नावाने प्रसिद्ध असलेले हे संत वादात सापडले आहेत. त्यांच्याविरोधात एका स्थानिक व्यक्तीने तक्रार दाखल करण्यासाठी राजकोटमधील पोलीस स्टेशन गाठले. काय आहे संपूर्ण प्रकरण - बाबांच्या बोलण्याने तो प्रभावित झाला आणि त्यांच्या सल्ल्यानुसार त्याने 13,000 रुपये दानधर्मासाठी दिल्याचे या व्यक्तीचे  म्हणणे आहे. मात्र, आता बागेश्वर धाम बाबांनी त्याचे पैसे परत करावेत अशी त्याची इच्छा आहे. हेमल विठलानी असे या तरुणाचे नाव आहे.

News18लोकमत
News18लोकमत

परवा बाबा बागेश्वरच्या दरबारात एका व्यक्तीने आश्रमाच्या बांधकामासाठी काही पैशांची मदत मागितली. अशा स्थितीत बाबांनी दरबारात बसलेल्या लोकांकडून पैसे मागितले. हेमल विठलानी देखील पैसे देणार्‍यांपैकी एक होते. मात्र, आता विठलांनी यांचे म्हणणे आहे की, बाबांचे म्हणणे ऐकून त्यांनी 13 हजार रुपये उत्साहात दिले. पण त्यांचे पैसे परत करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यासोबतच त्यांनी पोलीस आयुक्तांकडे मदतीचे आवाहनही केले आहे. राजकोट येथील रेसकोर्स मैदानावर 1 व 2 जून रोजी बाबा बधेश्वर यांच्या दिव्य दरबाराचे आयोजन करण्यात आले. यानंतर वडोदरा आणि नवलखी येथेही त्यांचा दरबार भरणार आहे. बाबा अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. सुरत येथे आयोजित करण्यात आलेला त्यांचा दरबार पावसामुळे काहीसा फिका पडला आणि त्यानंतर शेवटच्या क्षणी स्थळ बदलण्यात आले. त्यानंतर त्यांनी गुजरातके पागलों हा शब्द वापरून वाद निर्माण केला. यावेळी त्यांनी पाकिस्तानला हिंदू राष्ट्र बनवण्याबाबतही वक्तव्य केले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात