मराठी बातम्या /बातम्या /देश /

लॅपटॉप ऑर्डर केला पण फ्लिपकार्टने पाठवला कपडे धुण्याचा साबण, तक्रार केल्यावर कंपनीने दिले हे उत्तर

लॅपटॉप ऑर्डर केला पण फ्लिपकार्टने पाठवला कपडे धुण्याचा साबण, तक्रार केल्यावर कंपनीने दिले हे उत्तर

फ्लिपकार्टवरून वडिलांसाठी लॅपटॉप ऑर्डर केले होते.

फ्लिपकार्टवरून वडिलांसाठी लॅपटॉप ऑर्डर केले होते.

फ्लिपकार्टवरून वडिलांसाठी लॅपटॉप ऑर्डर केले होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 28 सप्टेंबर : ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरून आपल्या वडिलांसाठी लॅपटॉप ऑर्डर केल्यानंतर एका व्यक्तीला त्या ऐवजी जे पार्सल आले त्यामुळे त्याला धक्काच बसला. यानंतर जेव्हा त्याने कंपनीकडे तक्रार केली तेव्हा त्याला आणखी एक धक्का बसला, त्याला 'नो रिटर्न पॉलिसी'चे कारण देत कोणतीही कारवाई करण्यास नकार देण्यात आला.

नेमकं काय घडलं -

यशस्वी शर्मा हे आयआयएम अहमदाबादचे विद्यार्थी आहे. त्यांनी फ्लिपकार्ट वर सुरू असलेल्या बिग-बिलियन डे सेलवर आपल्या वडिलांसाठी लॅपटॉप ऑर्डर केला. मात्र, जेव्हा त्यांच्या वडिलांनी डिलिव्हरी बॉयकडून ऑर्डर घेतल्यानंतर पॅकेट उघडले तर त्यांना मोठा धक्का बसला. कारण त्यामध्ये कपडे धुण्याचा साबून आला होता. यानंतर यशस्वी यांनी लिंक्डइनवर एका लांबलचक पोस्ट टाकली. त्यात त्यांनी त्यांच्यासोबतची घटना शेअर केली आहे.

त्यानी लिहिले की, मी फ्लिपकार्टवरून वडिलांसाठी लॅपटॉप ऑर्डर केले होते. मात्र, वडिलांनी बॉक्स उघडला तेव्हा लॅपटॉपऐवजी साबणाचा बॉक्स सापडला. याबाबत त्यांनी फ्लिपकार्ट कस्टमर केअरकडे तक्रार केली असता त्यांनी आपली चूक मान्य करण्यास नकार दिला. यशस्‍वीने त्‍यांना डिलिव्‍हरीचे सीसीटीव्‍ही फुटेज असल्‍याचे सांगितले असल्याचेही सांगितले तरी कंपनीने 'नो रिटर्न पॉलिसी'चे कारण देत यशस्‍वी यांना नकार दिला.

डिलिव्हरी बॉयसमोर बॉक्स उघडायला हवा होता, ही चूक पीडित यशस्वीने मान्य केली आहे. ते पुढे म्हणाले की, माझ्या वडिलांना फ्लिपकार्टच्या 'ओपन बॉक्स डिलिव्हरी' याबाबत माहिती दिली नव्हती. पण ओटीपी घेताना डिलिव्हरी बॉयने हे सांगायला हवे होते. वडिलांना न कळवता तो ओटीपी देऊन निघून गेला.

तो गेल्यानंतर वडिलांनी पॅकेज उघडले तेव्हा त्यात लॅपटॉपऐवजी कपडे धुण्याचा साबण निघाला. जेव्हा त्यांनी कंपनीशी संपर्क साधला तेव्हा त्याने 'ओपन बॉक्स डिलिव्हरी' चे कारण देत 'नो रिटर्न आणि नो रिफंड' असे स्पष्ट केले. त्यांंच्याकडे डिलिव्हरी आणि पॅकेज उघडण्याचे दोन्ही सीसीटीव्ही फुटेज असूनही, कंपनीने ते स्वीकारण्यास नकार दिला आहे.

हेही वाचा - एअरपोर्टवरच प्रवाशाला Heart attack; CISF जवानाने असा वाचवला जीव की VIDEO पाहून सर्वांनी केलं सॅल्युट

आता ग्राहकाने ही बाब सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडली आहे. त्यांनी फ्लिपकार्टचे सीईओ कल्याण कृष्णमूर्ती आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनाही त्यांच्या पोस्टमध्ये टॅग केले आहे. हे प्रकरण इंटरनेटवर जोरदारपणे मांडले जात आहे.

First published:

Tags: Flipkart fraud, Online fraud