जाहिरात
मराठी बातम्या / देश / धक्कादायक! लोन आणि डेबिट कार्ड देऊन, बँक अशी करायची ग्राहकांची फसवणूक

धक्कादायक! लोन आणि डेबिट कार्ड देऊन, बँक अशी करायची ग्राहकांची फसवणूक

प्रतिकात्नक फोटो

प्रतिकात्नक फोटो

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही बनावट बँक चालवणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली १० नोव्हेंबर : दिवसेंदिवस फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अनेक गुन्हेगार लोकांची फसवणूक करून पैसे मिळवण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधून काढतात. काहीजण उघडपणे बँका लुटतात. पण, तमिळनाडूतील एका व्यक्तीनं पैसे मिळवण्यासाठी वापरलेली युक्ती बघून तुम्ही आश्चर्यानं तोंडात बोटं घातल्याशिवाय राहणार नाहीत. तमिळनाडूतील 44 वर्षीय व्यक्तीनं लोकांचे पैसे हडप करण्यासाठी एक बनावट बँक तयार केली. विशेष म्हणजे ही बनावट बँक अगदी खऱ्या बँकेप्रमाणेच काम करत होती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही बनावट बँक चालवणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. ग्रामीण व कृषी शेतकरी सहकारी बँक (Rural and Agricultural Farmer’s Cooperative Bank) असं या बनावट बँकेचं नाव आहे. तमिळनाडूमध्ये या बँकेच्या तब्बल नऊ शाखा होत्या. संपूर्ण तमिळनाडूतून सुमारे तीन हजार लोकांनी या बँकेत खाती उघडली होती. केंद्रीय गुन्हे शाखेच्या (सीसीबी) बँक फसवणूक तपास शाखेने शनिवारी ही बँक चालवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली. या प्रकरणी तमिळनाडूतील थाउजंड लाइट्स मेट्रो स्टेशन परिसरात राहणाऱ्या चंद्रबोस नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. चंद्रबोसकडून अनेक कागदपत्रं, एक आलिशान कार आणि 56.6 लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. बनावट सर्टिफिकेटच्या आधारे सुरू केली बँक मनीकंट्रोलनं दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी चेन्नई शहराचे पोलीस आयुक्त शंकर जिवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून अलर्ट मिळाल्यानंतर तपास करण्यात आला. त्यानंतर या बनावट बँकेचा पर्दाफाश झाला. या बनावट बँकेकडे आरबीआयची बनावट प्रमाणपत्रं होती. शिवाय, खऱ्या बँकेत मिळू शकणाऱ्या सर्व सेवा या ठिकाणी होत्या. पोलिसांनी या कारवाईमध्ये डिपॉझिट स्लिप, पैसे काढण्याची स्लिप आणि कॅश मोजण्याचे मशीनही जप्त केलं आहे. कर्ज देण्याची आणि पैसे जमा करण्याची प्रक्रियाही सुरू होती या बनावट बँकेने लोकांना कर्ज दिलं आणि अनेक ग्राहकांचे पैसेही जमा केले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, खातं उघडणाऱ्या प्रत्येक ग्राहकाकडून सदस्यत्व शुल्क म्हणून 700 रुपये घेतले जात. त्यानंतर बँक ग्राहकाला 500 रुपये शिल्लक असलेलं क्रेडिट किंवा डेबिट कार्ड देत असे. खाते क्रमांक आणि कार्ड क्रमांक एकच असायचा. ही बँक फिक्स डिपॉझिटचीही सुविधा देत होती. या माध्यमातून ग्राहकांना इतर बँकांपेक्षा जास्त व्याजाचं आमिष दिलं जात होतं. डेबिट आणि क्रेडिट कार्डमध्येही घोटाळा पोलीस आयुक्तांनी सांगितलं की, या बँकेने अनेक सोसायट्या स्थापन केल्या आहेत. याद्वारे आयसीआयसीआय बँकेकडून क्रेडिट आणि डेबिट कार्ड मिळवलं होतं. आयसीआयसीआय बँकेच्या डेबिट व क्रेडिट कार्डवर ग्रामीण आणि कृषी किसान सहकारी बँकेचे स्टिकर चिकटवून ग्राहकांना दिलं जात होतं.

    News18लोकमत
    News18लोकमत

    फसवणुकीच्या अशा घटनांपासून वाचण्यासाठी प्रत्येकानं व्यवस्थित चौकशी केल्यानंतरच एखाद्या वित्तीय संस्थेमध्ये आपले पैसे गुंतवले पाहिजेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात