मराठी बातम्या /बातम्या /देश /ममतांनी एका मिदनापूरमधूनच दिले 6 मंत्री; शुवेंदू अधिकारींचे पंख छाटण्याचा डाव?

ममतांनी एका मिदनापूरमधूनच दिले 6 मंत्री; शुवेंदू अधिकारींचे पंख छाटण्याचा डाव?

नवीन मंत्रिमंडळाच्या निर्मितीपासूनच ममतांनी 'अधिकारी' कुटुंबाला इशारा दिला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamta Banerjee) यांनी अधिकारींचे वर्चस्व असलेल्या मेदिनीपूर भागात सहा नेत्यांना मंत्रीपद बहाल केलं आहे.

नवीन मंत्रिमंडळाच्या निर्मितीपासूनच ममतांनी 'अधिकारी' कुटुंबाला इशारा दिला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamta Banerjee) यांनी अधिकारींचे वर्चस्व असलेल्या मेदिनीपूर भागात सहा नेत्यांना मंत्रीपद बहाल केलं आहे.

नवीन मंत्रिमंडळाच्या निर्मितीपासूनच ममतांनी 'अधिकारी' कुटुंबाला इशारा दिला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamta Banerjee) यांनी अधिकारींचे वर्चस्व असलेल्या मेदिनीपूर भागात सहा नेत्यांना मंत्रीपद बहाल केलं आहे.

कोलकाता, 13 मे : भाजपकडून प्रतिष्ठेच्या बनवलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये ममता बँनर्जींच्या (mamta banerjee) तृणमूल काँग्रेसनं दमदार विजय मिळवला. प्रचारामध्ये राळ उडवत बंगालमध्ये ममता बॅनर्जी सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्या. आता त्यांनी शपथ घेऊन काम देखील सुरू केले आहे. बंगालच्या मंत्रिमंडळानं देखील सोमवारी शपथ घेतली, यामध्ये एकूण 43 मंत्र्यांचा समावेश आहे. नवीन मंत्रिमंडळाच्या निर्मितीपासूनच ममतांनी 'अधिकारी' कुटुंबाला इशारा दिला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamta Banerjee) यांनी अधिकारींचे वर्चस्व असलेल्या मेदिनीपूर भागात सहा नेत्यांना मंत्रीपद बहाल केलं आहे.

पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात तृणमूलमधून भारतीय जनता पक्षात आलेले मोठे नेते शुवेंदु अधिकारी यांची मजबूत पकड असून या जिल्ह्यातील इतर भागांतही त्यांचा चांगला प्रभाव आहे. 2007 पासून अधिकारी यांनी या भागात टीएमसीसाठी एक मजबूत संघटना निर्माण केली होती. या संघटनात्मक आधारावर ममतांना नंदीग्राममध्ये नेहमीच जास्तीत-जास्त जागा सहज जिंकता येत होत्या. त्यांच्या वर्चस्वामुळं दोन्ही मेदिनीपूर जिल्ह्यात टीएमसीला फायदा होत असे.

मात्र, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये शुवेंदू अधिकारी यांनी टीएमसी पक्ष सोडत  भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळं पूर्व आणि पश्चिम मिदनापूरमधील सर्व जागा भाजपला जिंकण्याची अपेक्षा होती. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांमुळे हे स्पष्ट झालं की टीएमसीने पूर्व आणि पश्चिम मिदनापूर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोठा विजय मिळविला. आता अधिकारी कुटुंबाचे वर्चस्व आणखीन कमी करण्याच्या इराद्याने ममतांनी चाल खेळत या भागातील सहा नेत्यांना मंत्रीपद देण्यात आले.

हे वाचा - शॉर्ट कपडे घातले म्हणून महिलेला अटकेची धमकी; पोलिसांनी हाताला पकडून काढलं पार्कबाहेर, पाहा VIDEO

पश्चिम मेदिनीपूरमध्ये टीएमसीला 15 पैकी 13 आणि पूर्व मिदनापूर टीएमसीला 16 पैकी 9 जागा मिळाल्या आहेत. ममता बॅनर्जींच्या पक्षाने राज्यभरात शानदार प्रदर्शन केले, मात्र सुवेंदू अधिकारींनी ममतांना पूर्व मेदिनीपुरातील नंदीग्राम मतदारसंघात धक्कादायकरित्या पराभूत केले होते. निवडणुकीच्या निकालानंतर मेदिनीपूर फॅक्टर वर ममतांचे चांगलेच लक्ष आहे. टीएमसी या भागातील आपली गमावलेल्या जागा परत मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

पूर्व मेदिनीपूरमध्ये शुवेंदूचा कट्टर विरोधक असलेले सुमन महापात्रा आधीपासूनच मंत्री होते. त्यांनी पुन्हा कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली, त्यांना पाटबंधारे आणि जलमार्ग विभाग देण्यात आला. पश्चिम मेदिनीपूरमधील आणखी एक दिग्गज नेते मानस भुईयान यांना मंत्री करण्यात आले आहे.

हे वाचा - प्रेमविवाह केल्याच्या वादातून तरुणाची भर रस्त्यावर हत्या, अंबरनाथमधला थरकाप उडवणारा VIDEO

शुवेंदूचा विरोधक म्हणून ओळखले जाणारे अखिल गिरी यांना मत्स्यव्यवसाय विभागाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभारी) केले गेले आहे. गिरी हे बरेच वर्षे आमदार होते, परंतु त्यांना मंत्री बनविण्याची ही पहिलीच वेळ आहे. आयपीएस अधिकारी आणि नंतर राजकारणी झालेल्या हुमायून कबीर यांना तांत्रिक शिक्षण, प्रशिक्षण आणि कौशल्य विकास विभागाचा स्वतंत्र कार्यभार मिळाला आहे.

टीएमसीच्या आणखी एक आमदार शुली साहा यांना राज्यमंत्री करण्यात आले आहे.  टीएमसीचे अनेक नेते एकापाठोपाठ एक भाजपमध्ये सामील झाले, तरीही त्या पक्षात राहिल्या आणि या निवडणुकीत त्यांनी आपल्या जुन्या मतदारसंघ केशपूरमधून विजय मिळविला. पश्चिम मेदिनीपूरचे टीएमसीचे आणखी एक आमदार श्रीकांत महतो यांनाही मंत्री करण्यात आले आहे.

First published:
top videos

    Tags: Mamata banerjee, West bangal, West Bengal Election