Home /News /national /

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी नंदीग्राम निकालाला उच्च न्यायालयात दिलं आव्हान, उद्या सुनावणी

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी नंदीग्राम निकालाला उच्च न्यायालयात दिलं आव्हान, उद्या सुनावणी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी नंदीग्राम निवडणुकीच्या निकालाला कलकत्ता उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

    कोलकाता, 17 जून : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी नंदीग्राम निवडणुकीच्या निकालाला कलकत्ता उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या प्रकरणी शुक्रवारी सुनावणी होणार आहे. तिसऱ्यांदा राज्यात सत्तेत आलेल्या ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेसला निवडणुकीत दोनशेहून अधिक जागा मिळाल्या. परंतु, त्या स्वत: निवडणुकीत पराभूत झाल्या. तेव्हापासून ममता नंदीग्रामच्या निवडणुकीच्या निकालाबाबत सातत्याने आरोप करत आहेत. 2 मे रोजी निवडणुकीच्या निकालानंतर ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधील (Nandigram Election Results) जनतेचा निर्णय स्वीकारल्याचे म्हटले होते. परंतु, मतमोजणीच्या वेळी गैरप्रकारांच्या मुद्द्यावर त्या न्यायालयात जातील, असे त्यांनी म्हटलं होतं. निवडणुकीच्या निकालाच्या घोषणेनंतर काही फेरफार करण्यात आल्याची माहिती आपल्याकडे असल्याचे सांगत आपण ती जाहीर करू असं बॅनर्जी पुढे म्हणाल्या. खरं तर निवडणुकीचा कल आल्यानंतर शुभेंदू अधिकारीच आघाडीवर होते. मात्र, 16 व्या फेरीच्या मतमोजणीपर्यंत ममता बॅनर्जी पुढे होत्या, त्यानंतर खेळ उलटला आणि अधिकारी पुढे आले आणि विजय जाहीर झाला. हे वाचा - कोरोनामुक्त झाल्यानंतर दात आणि हिरड्या देतायेत धोक्याची घंटा; तुम्ही तपासणी केली का? सध्या विरोधी पक्षनेते आहेत शुभेंदू अधिकारी ममता यासंदर्भात न्यायालयात जाऊ शकतात, असा अंदाज राजकीय वर्तुळात बांधला जात होता. नंदीग्राममध्ये ममतांचा पराभव करणारा नेता शुभेंद्रू अधिकारी सध्या पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी वादळाच्या आढावा बैठकीसाठी पश्चिम बंगालमध्ये गेले होते. तेव्हा बैठकीत झालेल्या वादामागे शुभेंदू अधिकारीच असल्याचं सांगितलं गेलं होतं. खरं तर ही बैठक पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यातच व्हायला हवी, असं तृणमूल काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आलं. विरोधी पक्षनेत्याचं बैठकीत काही काम नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. तथापि, अशीच प्रथा अन्य राज्यांतही आहे, असं नंतर केंद्राने स्पष्ट केलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Mamta Banerjee, West bengal, West Bengal Election

    पुढील बातम्या