LIVE NOW

LIVE: मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेलं पॅकेज फसवं, भाजपने केली टीका

कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर

Lokmat.news18.com | October 23, 2020, 10:25 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated October 23, 2020
auto-refresh

Highlights

10:25 pm (IST)

नंदुरबार - सारंगखेडा गावात 15 वर्षांच्या तरुणीचा खून
गळा कापून पोत्यात भरून मृतदेह फेकला उसाच्या शेतात
पोलिसांनी एका संशयिताला घेतलं ताब्यात
प्रेम प्रकरणातून तरुणीचा खून झाल्याचा पोलिसांचा दावा

10:25 pm (IST)

अंबरनाथमध्ये पोलिसावर तलवारीनं प्राणघातक हल्ला
पोलीस ठाण्याच्या बाहेरच पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला
ट्रॅफिक जॅममध्ये वाद झाल्यानं चौघांनी केला हल्ला
बाळा चव्हाण असं जखमी पोलीस कर्मचाऱ्याचं नाव
बाळा चव्हाण हे सेंट्रल पोलीस ठाण्यात कार्यरत
हल्लेखोर कार सोडून रिक्षा घेऊन झाले पसार
पोलिसांकडून हल्लेखोरांचा युद्धपातळीवर शोध सुरू
चव्हाण यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू 

9:00 pm (IST)

'मंदिरं उघडण्यासाठी दबावाला बळी पडले नाहीत'
आरोग्याला प्राधान्य देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचं कौतुक
दिग्गजांकडून उद्धव ठाकरेंच्या पाठीवर कौतुकाची थाप
सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गजांचं पत्र
ठाम भूमिका घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं केलं अभिनंदन 

8:37 pm (IST)

राज्यात कोरोनाच्या 7,347 नव्या रुग्णांची भर
राज्यात आज कोरोनामुळे 184 रुग्णांचा मृत्यू
राज्यात आज 13,247 रुग्ण बरे होऊन घरी
आतापर्यंत एकूण 14,45,103 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 88.52 टक्के
राज्यात एकूण 1,43,922 अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण

8:32 pm (IST)

गीता जैन उद्या शिवसेनेत करणार प्रवेश
मीरा-भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन
'मातोश्री'वर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश
काही नगरसेवकही प्रवेश करण्याची शक्यता 

7:25 pm (IST)

पुणे - उरुळी कांचनमधील धक्कादायक घटना
मित्रांशी शरीरसंबंध ठेवत नाही म्हणून मारहाण
पतीसह चौघांची महिलेला रॉड,पट्ट्यानं मारहाण
पीडित महिलेची 5 जणांविरोधात तक्रार
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

6:57 pm (IST)

केंद्र सरकारकडून कांदा साठवणुकीवर निर्बंध
किरकोळ विक्रेत्याला 2 टन कांदा साठवता येणार
व्यापाऱ्याला 25 टन कांदा साठवणुकीची मर्यादा
वाढत्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी पाऊल
केंद्राच्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांसह शेतकरी नाराज

6:03 pm (IST)

'खडसेंना लिमलेटची गोळी देणार की चॉकलेट?'
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा टोला 

5:03 pm (IST)

मंत्रिमंडळात कोणतेही बदल होणार नाहीत -शरद पवार
माध्यमातील तर्कवितर्कांना शरद पवारांकडून पूर्णविराम 

4:45 pm (IST)

आजचा दिवस आनंदाचा -शरद पवार
'खान्देशात आपली ताकद वाढवणं गरजेचं'
'जळगाव हा निष्ठेनं काम करणारा जिल्हा'
'खडसेंचा अनुभव पक्षासाठी मोलाचा ठरेल'
'नाथाभाऊंच्या रूपानं आपली ताकद वाढेल'
खान्देशात राष्ट्रवादीला बळ मिळेल -पवार
'खडसेंमुळे राष्ट्रवादीचा विचार खान्देशात पोहोचेल'
खडसे कोणत्याही अपेक्षेनं आले नाहीत -पवार
नाथाभाऊ शब्द पाळणारे नेते -शरद पवार
'आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर'
राज्य सरकारनं मदत जाहीर केली -शरद पवार
आव्हाड नाराज असल्याचं वृत्त निराधार -पवार
अजित पवार नाराज नाहीत -शरद पवार
कोरोनाकाळात काळजी घेणं गरजेचं -शरद पवार

Load More
मुंबई, 23 ऑक्टोबर : कोरोनाचे अपडेट्स आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर