कुनो : दक्षिण आफ्रिया आणि नामबियामधून आणलेल्या चित्त्यांपैकी आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे कुनो नॅशनल पार्कमध्ये थोडं तणावाचं वातावरण आहे. मध्य प्रदेशातील कुनो इथे 12 चित्ते आणण्यात आले. पर्यटकांसाठी ही मोठी पर्वणी म्हटलं जात आहे. मात्र आतापर्यंत 6 चित्त्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ‘तेजस’ नावाच्या नर चित्ताचाही मृत्यू झाला आणि पुन्हा चित्त्यांच्या संवर्धन आणि संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. निगराणी पथकाला चित्त्याच्या मानेवर जखमेच्या खुणा दिसल्या. तो बराच काळ बेशुद्ध असल्याचं दिसलं. अखेर त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
Chandrayaan-3 : चांद्रयान मोहिमेचं मुंबईशी खास कनेक्शन, ‘या’ कंपनीत तयार झालं यानाचं इंजिनया चित्त्याला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं आहे. अहवाल आल्यानंतर या चित्त्याचा मृत्यू नेमका कसा झाला याची माहिती मिळू शकेल. चित्त्याच्या मानेवर जखमा कशा झाल्या याचाही शोध घेतला जात आहे. कुनोचे डीएफओ पीके वर्मा यांनी सांगितले की, तेजसला पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले असून त्यानंतर मृत्यूचे कारण समोर येईल.
सध्या चित्त्याच्या मृत्यूचा तपास सुरू आहे. आतापर्यंत चार चित्ते आणि तीन शावकांचा मृत्यू झाला आहे. 27 मार्च रोजी किडनीच्या आजाराने साशा नावाच्या मादी चित्त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही महत्त्वाकांक्षी मोहीम असताना हे असे प्रकार घडतात कसे याचाही तपास केला जात आहे.