Home /News /national /

वाजतगाजत पार पडला Gay विवाह सोहळा, घरच्यांची प्रतिक्रिया होती खास; पाहा VIDEO

वाजतगाजत पार पडला Gay विवाह सोहळा, घरच्यांची प्रतिक्रिया होती खास; पाहा VIDEO

त्या दोन तरुणांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. मग त्यांनी जाहीरपणे एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि वाजतगाजत लग्न केलं.

  हैदराबाद, 3 जानेवारी: एकमेकांच्या प्रेमात (Love) आकंठ बुडालेल्या दोन तरुणांंचा (Gay couple) विवाह (Marriage) सोहळा वाजत-गाजत आणि उत्साहात पार पडला. दिल्लीकर अभय डांगे (Abhay Dange) आणि पश्चिम बंगालचा सुप्रियो चक्रवर्ती (Supriya Chakraborthi) यांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. एखादं सर्वसामान्य लग्न ज्या धामधुमीत आणि रितीरिवाजांसह पार पडतं, अगदी तसाच हा विवाहसोहळादेखील पार पडला. यावेळी दोन्हीकडची पाहुणे मंडळी आणि मित्रमंडळी उपस्थित होती.
  अशी झाली ओळख अभय एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करतो तर सुप्रियो हा हॉटेल मॅनेजमेंट कंपनीत सिनियर पोस्टवर आहे. सुप्रियोनं दिलेल्या माहितीनुसार त्यांची पहिली डेट 7 तास चालली आणि त्यानंतर सुप्रियो अभयसोबत केस कापण्यासाठी सलूनमध्येदेखील गेला. त्यापूर्वी कॉफी पिण्यासाठी भेटलेल्या दोघांमध्ये सुरेख गप्पा रंगल्या आणि त्यांनी वारंवार एकमेकांना भेटण्याचा निर्णय घेतला. अभय हा अत्यंत शांत स्वभावाचा आहे तर मी फटकळ आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रियोनं दिली आहे. घरच्यांची मिळाली साथ जेव्हा सुप्रियोनं ही गोष्ट घरच्यांना सांगितली, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय असेल, याची त्याने कल्पनाही केली नव्हती. आपण ही गोष्ट आईला सांगितल्यावर काही क्षण ती शांत बसली आणि त्यानंतर आपल्याला मिठी मारत माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम होतं, आहे आणि राहिल असं म्हणाली. त्यामुळे आपल्या मनावरचं दडपण एकदम कमी झालं, अशी प्रतिक्रिया सुप्रियोनं दिली आहे. तर अभयनं लग्न करण्याचं निश्चित झाल्यावरच घरच्यांना आपण गे असल्याची कल्पना दिल्याचं म्हटलं आहे. दोघांच्याही घरच्यांनी त्यांच्या लग्नाला परवानगी दिली आणि उत्साहात त्यांचा विवाह सोहळा पार पडला.
  कोरोनात दिली साथ कोरोनाच्या पहिल्या लाटेत अभय आणि सुप्रियो हे दोघंही कोरोना पॉझिटिव्ह होते. दोघांनीही एकमेकांची प्रचंड काळजी घेतली आणि सतत एकमेकांसोबत राहिले. त्या काळात आपलं एकमेकांवरचं प्रेम अधिकच वाढल्याचं ते सांगतात. हे वाचा- राज्यात पुन्हा ढगाळ स्थिती; तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज, कसं असेल हवामान? आयुष्यभराची साथ अगोदर समलैंगिक लग्नाला भारतात मान्यता नव्हती. त्यामुळे आपण केवळ एकत्र राहू, एवढंच आम्ही ठरवलं होतं. मात्र आता कायदेशीर कवच मिळाल्यामुळे आम्ही जोरदार लग्न केल्याचं दोघंही सांगतात. आम्ही दोघंही एकमेकांचे ‘पती’ झाले असून सुखानं संसार करू, असं त्यांनी म्हटलं आहे.
  Published by:desk news
  First published:

  Tags: Hyderabad, Love, Marriage

  पुढील बातम्या