नवी दिल्ली, 26 जुलै : पंडित धीरेंद्र कृष्णशास्त्री (बाबा बागेश्वर) हे मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गार्हा गावातील बागेश्वर धामचे मुख्य पुजारी आहेत. हे बाबा आपल्या अनुयायांच्या अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘दिव्य दरबार’ भरवतात. बाबा बागेश्वर यांनी सध्या युनायटेड किंग्डममध्ये त्यांचा दिव्य दरबार आयोजित केलेला आहे. यूकेमधील लिसेस्टर येथील दरबारादरम्यान बागेश्वर बाबांना अवघडलेल्या परिस्थितीचा सामना करावा लागला. यूकेमध्ये स्थायिक झालेल्या एका मुलीनं ‘दिव्य दरबारा’मध्ये सर्व काही पूर्वनिश्चित असतं, असा आरोप केला आहे. या मुलीनं दावा केला की, बाबा बागेश्वर कोणत्या ना कोणत्या युक्त्या खेळतात आणि त्यांना काही गोष्टी आधीच माहीत असतात. या मुलीनं सांगितलं की, तिच्या मैत्रिणीची आणि तिच्या आईची बाबा बागेश्वरवर फार श्रद्धा आहे. त्यांच्या सांगण्यावरून ती लिसेस्टरमधील दैवी दरबारात आली होती. एखाद्या सामान्य माणसाला दुसर्या व्यक्तीच्या मनात काय आहे, हे समजणं अशक्य आहे. ही गोष्ट पडताळून बघण्यासाठीच ती बाबाच्या दरबारात आली होती. पंडित धीरेंद्र कृष्णशास्त्री याने त्या मुलीला नुकतंच तिच्या मित्रासोबत फोनवर झालेल्या संभाषणाची माहिती दिली. तिनं फार काळ मनात जपलेलं गुपित उघड करून, बाबा बागेश्वरने तिला सांगितलं की, ती ज्या व्यक्तीसोबत दरबारात आली आहे तिच्याशी तिला लग्न करायचं आहे. त्यानंतर बाबा बागेश्वर याने खुलासा केला की, या मुलीची प्रेमात एकदा फसवणूक झाली होती आणि ती अजूनही योग्य जोडीदाराच्या शोधात आहे. त्यानंतर बाबानी तिची कुंडली मांडली आणि मुलीला आश्वस्त केलं की तिचा प्रियकर तिच्यासाठी योग्य जोडीदार असेल. तिने त्याच्याशी लग्न करावं. हे सर्व ऐकून ती मुलगी म्हणाली, “आता मला पूर्ण खात्री पटली आहे की तुमच्यामध्ये काहीतरी वेगळी क्षमता आहे. लोक कधीकधी स्वार्थी होऊन स्वतःबद्दल विचार करतात, पण तुमच्यात नक्कीच दैवी शक्ती आहे.” 26 वर्षाचा पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री अविवाहित आहे. बागेश्वर धाम सरकारच्या लाखो पाठिराख्यांचा असा विश्वास आहे की, त्याच्याकडे दैवी शक्ती आहे आणि तो आजारी व्यक्तींना बरं करू शकतो. अनेक प्रभावी मंत्री, राजकारणी आणि सेलिब्रिटी त्याचे अनुयायी आहेत. टीव्ही आणि सोशल मीडिया सेन्सेशन असलेल्या बाबा बागेश्वर याचे सोशल प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. त्याचे फेसबुकवर जवळपास 3.4 दशलक्ष, इन्स्टाग्रामवर 300,000 आणि ट्विटरवर 72,000 फॉलोअर्स आहेत. तर, यूट्युबवर 3.9 दशलक्ष सबस्क्रायबर आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.